औरंगाबाद: सोयगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच चर्चेला उधान,शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक स्पर्धेत

सोयगाव,ता.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जिल्हाभरातील पंचायत समित्यांचे सोमवारी सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.यामध्ये सोयगाव पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाला सुटल्याने सोयगावला सभापती पदासाठी शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक सदस्य इच्छुक असल्याने सोयगाव तालुक्यात चर्चेला उधान आले असून सोयगावला सभापती कोण होणार याबाबत उत्सुकता लागून आहे.
सोयगाव पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकडे गेले आहे.या प्रवर्गातून रस्तुलबी पठान(फर्दापूर गण शिवसेना)प्रतिभा जाधव(बनोटी गण शिवसेना)आणि लताबाई राठोड(भाजप निंबायती गण)या तीन महिला सदस्य सभागृहात आहे.यामध्ये शिवसेनेच्या दोन्हीही सदस्य स्पर्धेत असून भाजपचं वतीने लताबाई राठोड यांचीही इच्छुकांमध्ये असल्याने सोयगावला भाजप-शिवसेना अशी चुरस वाढली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *