परळी:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र सरकार कडून दि 17 /3 /2016 वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वसंतराव मुंडे यांचे शेअर्स परत करण्यासंदर्भात साखर आयुक्त पुणे यांच्याकडून वैद्यनाथ कारखाना पांगरी यांना आदेश प्राप्त झाले आहेत परंतु आजतागायत कारखान्याकडून 10025 रुपये शेअर परत केले गेले नाहीत करिता कॉँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार भारत सरकार नाशिक विभाग यांनी शासनाकडे दिनांक 4/2/2019 व 16/5/2019 तसेच दि 11/9/2019 ला वैद्यनाथ सहकारी कारखाना पांगरी चौकशी संदर्भात मुद्दे निहाय अर्ज केला आहे यावर शासनाने दिनांक 23/ 9 /2019 ला सर्व स्तरावर ची चौकशी करून मुद्दे निहाय कारवाई करून अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याचे आदेश प्रमोद वळंज अवर सचिव सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलेले आहेत वसंतराव मुंडे गेली तीन वर्षापासून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी चा स्वतःचा शेअर्स 10025 रुपये परत करण्याची शासनाकडून आदेश व कारखान्याला स्वतः अर्ज देऊन मागणी केली आहे परंतु आजतागायत शेअर्स परत केलेला नाही करिता शासनाकडून आदेशाचे वैद्यनाथ कारखान्याकडून अंमलबजावणी होत नाही तरी त्वरित शेअर्स परत करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांना बोलताना माहिती दिली आहे.