परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाची जय्यत तयारी ;गोपीनाथ गडावर उद्या राज्यभरातून उसळणार अलोट गर्दी

परळी:आठवडा विशेष टीम―लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या १२ डिसेंबरच्या जयंती कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून यादिवशी लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, 'हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्ही या..वाट पहाते' असे ट्विट करत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती येत्या १२ डिसेंबर रोजी असून गोपीनाथ गडावर त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या काना कोप-यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते येत असतात, यंदाही गडावर अलोट गर्दी उसळणार आहे. जयंती कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १२ तारखेला सकाळी ११ वा. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे याठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  पंकजाताई मुंडे यांचे ट्विट

  पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाचे निमंत्रण कार्यकर्त्यांना दिले आहे.'१२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना 'गोपीनाथ गड' येथे आमंत्रण.. तुम्ही सारे या .. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे, तुम्हीही या .. वाट पहाते..असे ट्विट त्यांनी केले आहे.

  महा आरोग्य शिबीर आजपासून

  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उप जिल्हा रूग्णालयात उद्या ११ व १२ डिसेंबर दरम्यान महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे, ११ तारखेला सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. आणि १२ तारखेला सकाळी ९ ते १२ वा. दरम्यान हे शिबीर होणार आहे. शिबीरात सहभागी होणा-या गरजू रूग्णांची सर्व आजारांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. पुरूष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचार देखील यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूट साठी १२ तारखेला उप जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधायचा आहे, शिबीराचा जास्तीत जास्त गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.