उस्मानाबाद जिल्हातुळजापूर तालुका

तुळजापूर येथे पोलिसांकडून पत्रकारास अमानुष मारहाण

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी―तालुक्यातील माळुंब्रा येथील खाजगी सोलार कंपनीकडे 20 लाखाची खंडणी मागितली म्हणून तुळजापूर येथील म मराठीचे न्युज चॅनलचे पत्रकार राहुल कोळी यांना तुळजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षण हर्षवर्धन गवळी यांनी अमानुषपणे मारहाण केली.

याविषयी अधिक माहिती अशी की,तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारात दि .६ डिसेंबर रोजी वेळ ३ .३० वा.सुमारास क्लीन टेक सोलार कंपनी, मुंबई यांच्या साईटवर साथीदारांसह काम करत होते. यावेळी 1) विकी वाघमारे 2) राहुल कोळी व इतर दोन अनोळखी पुरुष सर्व रा. तुळजापूर यांनी तेथे येउन “ तुळजापूर येथे मशीन कामाला का लावल्या नाहीत ?, तुम्हाला काम करायचे असेल तर आम्हाला कामावर घ्या नाहीतर आम्हाला 20 लाख रुपये द्या.” असे धमकावून साईटवरील मशनरींची तोडफोड करुन अंदाजे 4,50,000/- रु. चे नुकसान केले. तसेच त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मीर ईम्तीयाज आलम यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. तामलवाडी येथे गुन्हा दि. 07.12.2019 रोजी नोंदवण्यात आला होता .

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  तुळजापूर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी कर्मचारी मार्फत राहुल कोळी यांना सोमवारी दुपारी 1.45 वाजता पोलीस स्टेशन तात्काळ बोलावून घेतले होते,राहुल कोळी यांनी पोलीस निरीक्षक यांना साहेब मला कशासाठी बोलावले आहे असे विचारताच हर्षवर्धन गवळी यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत माळुंब्रा येथील खाजगी सोलार कंपनीकडे 20 लाखाची खंडणी मागितली आहेस अशी तक्रार आमच्याकडे अली आहे असे म्हणत चक्रधर पाटील,राऊत,हर्षवर्धन गवळी यांनी राहुल कोळी यांना अमानुषपणे मारहाण केली त्यांरणार तामलवादी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मिरकर यांच्या ताब्यात राहुल कोळी यांना देण्यात आले,सायंकाळी 5. 30 वाजता तक्रारदार यांच्या समोर ओळख परेड केले असता संमधीत तक्रारदार यांनी हा राहुल कोळी नाही असे स्पष्ट सांगिलते व लेखी सुद्धा दिले आहे.

  तुळजापूर शहरातील आवैध धंद्याधाबाबाबत बातम्या लावल्याने पोलीस प्रशासन पत्रकारांची गळचेपी करत असल्याचे दिसून येत आहे.

  याबाबत तुळजापूर पत्रकार संघाच्या सदस्यांनी राहुल कोळी पत्रकार व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्याशी हे प्रकरण वास्तव काय आहे हे जाणून घेतले अन उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. दिलिप टिपरसे यांना भेटून या विषयात योग्य तपास करून संबधीतावर कार्यवाही करावी अशी मागणी केली.

  "माळुंब्रा खंडनी प्रकरणात गुन्हा नोंद असणारा राहुल कोळी हा पत्रकार नसल्याचे चौकशीत सिद्ध झालेले आहे,राहुल कोळी अशी तक्रार नोंद झाल्याने तुळजापूर येथील पत्रकार राहुल कोळी यांना ताब्यात घेतले होते,यावर व्हिडीओ क्लीप तपासणीत पत्रकार राहुल कोळी नसल्याचे निर्देशनात निष्पन्न झाले त्यामुळेच राहुल कोळी यांना सोडून देण्यात आले आहे.या प्रकरणात वास्तव काय आहे याचा तपास करण्यात येईल असेही यावेळी म्हणाले."

  ―डॉ.दिलीप टिपरसे
  पोलीस उपअधीक्षक

  तुळजापूर शहरातील अवैध धनधाबाबाबत मी म मराठी चॅनल च्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्याचा रोष तुळजापूर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी खंडणी प्रकरणात माझी कसलीही चौकशी न करता मला गोवले व मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली,यावेळी चक्रधर पाटील व राऊत या तिघांनी मिळून मला मारहाण केली तरी वरिष्ठांनी या प्रकरणात चौकशी संबंधितावर कारवाई करावी.

  ―राहुल कोळी
  संपादक म मराठी

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.