आय एम एस इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी हरिश्चंद्रगडाला दिली भेट

अहमदनगर:आठवडा विशेष टीम― इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अहमदनगर या इन्स्टिट्यूट मध्ये कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी हरिश्चंद्र गडाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दिनांक 15 डिसेंबर 2019 रोजी भेट दिली.

हरिश्चंद्र हा गड निसर्गप्रेमींची पंढरी म्हणुन ओळखला जातो हा गड नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात आहे.हरिश्चंद्र हा माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर आहे.या डोंगरावर हरिश्चंद्र तारामती रोहिदास ही शिखरे आहेत.त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर,कोकण कडा व डोंगररांगा असे अनेक निसर्गरम्य ठिकाणे येथे आहेत.

या गडाची उंची चार हजार फूट असून विद्यार्थ्यांनी पायी प्रवास करून या संपूर्ण गडाचा आढावा घेतला.यामध्ये अभिजीत जावळे, आशुतोष मेहरे, अनंत आंधळे,संदीप नाकडे प्रकाश म्हस्के, सलीम शेख, प्रभाकर काळे व विजय नवले यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *