अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

नॅशनल हॅण्डरायटींग कॉम्पीटीशन मध्ये अंबाजोगाईच्या पार्थ अ‍कॅडमीचे दोन विद्यार्थी राज्यात सर्वप्रथम

विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर संधी देणारी पार्थ अकॅडमी-राजकिशोर मोदी

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
सलग तिसर्‍या वर्षी राज्यात सर्व प्रथम येण्याची परंपरा पार्थ अ‍कॅडमीने कायम राखत ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचा व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले असल्याचे प्रतिपादन करून अंबाजोगाईचे नाव सर्वदुर पोहोंचविणारी व विद्यार्थ्यांना राज्यपातळीवर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देणारी पार्थ अकॅडमी असल्याचे बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजशिकोर मोदी म्हणाले. अंबाजोगाईत पार्थ अ‍कॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

अंबाजोगाईत रविवार,दि.15 डिसेंबर रोजी पार्थ अ‍ॅकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन लातूर डायटचे अधिव्याख्याता डॉ.अनिल मुरकूटे तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत,रामराव आडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना राजकिशोर मोदी यांनी पार्थ अ‍कॅडमीचे गुणवंत विद्यार्थी हे अंबाजोगाईकरांचा अभिमान असल्याचे सांगितले.तर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत,रामराव आडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोप करताना वरिष्ठ अधिव्याख्याता अनिल मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण,वाचन आणि स्पर्धेचे आव्हान या बाबत सखोल मार्गदर्शन करून भाषा व वाणी चांगली हवी,वाचन व लेखन याला जगात पर्याय नाही.यशाचे मोल पैशात होवू शकत नाही. विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे असे आवाहन केले.प्रास्ताविक करताना पार्थ अ‍कॅडमीचे संचालक विनोद आडे यांनी अ‍कॅडमीचे कार्य, उद्देश व आज पर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला.आपले विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आहेत.या पुढे ही परंपरा कायम राखली जाईल असे सांगुन अंबाजोगाई व पुणे येथे कार्यरत असणा-या अकॅडमीच्या नाशिक,लातूर येथे लवकरच शाखा सुरू करणार असल्याचे विनोद आडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यनारायण यादव यांनी करून उपस्थितांचे आभार रामराव आडे यांनी मानले.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नॅशनल हॅण्डरायटींग कॉम्पीटीशन मध्ये राज्यात प्रथम आलेले प्रिती आढाव (ग्रुप ए- राज्यात सर्वप्रथम),शेख इरफान (ग्रुप सी-राज्यात सर्वप्रथम), ऋषीकेश आच्युत मुंडे (ग्रुप ए 9 वी ते 12 वी),स्नेहा राजमाने (ग्रुप बी 1 ली ते 4 थी) तसेच नॅशनल हॅण्डरायटींग कॉम्पीटीशन मध्ये सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी (ग्रुप ए 1 ली ते 4 थी-श्रीजा कुलकर्णी (प्रथम क्रमांक),ओमकेश आंधळे (ग्रुप बी 5 वी ते 8 वी) प्रथम क्रमांक, प्रणव कदम (ग्रुप बी-द्वितीय क्रमांक),साक्षी संजय आपेट (तृतीय क्रमांक),इरफान शेख (ग्रुप ए-द्वितीय क्रमांक), ओमकेश आंधळे (ग्रुप बी- द्वितीय क्रमांक),नॅशनल हॅण्डरायटींग ऑलिम्पीयाड साक्षी संजय आपेट (ग्रुप बी- तृतीय क्रमांक),उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रणव कदम नेहा काचगुंडे,शिरीष कानवले (सर्व जण ग्रुप बी),सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.या सोबतच पार्थ अ‍कॅडमीला बेस्ट परफॉर्मन्स स्कुल अ‍वाॅर्ड प्राप्त झाले.सतत तीन वर्षे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल पार्थ अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओम पिंपळे,विशाल आकाते, कृष्णा यादव,गोविंद होळंबे, अमृता महामुनी,अमन राठोड यांनी पुढाकार घेतला.गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच अ‍कॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पार्थ अ‍कॅडमी म्हणजे गुणवंत घडविणारी कार्यशाळा

अंबाजोगाई शहरात 1 फेब्रुवारी 2016 रोजी पार्थ अ‍कॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेसची सुरूवात झाली.गत तीन वर्षांमध्ये या अ‍कॅडमीने शहर व परिसरातील सुमारे 800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात अमुलाग्र बदल करण्याचे काम विनोद रामराव आडे (कॅलिग्राफर) यांनी केले.आज पर्यंत अ‍कॅडमीच्या 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकासह अनेक पारितोषिके मिळविली. ज्यात शालेय,जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचा समावेश आहे. 'नॅशनल हॅण्डरायटींग कॉम्पीटीशन' मध्ये 100 पैकी 98 गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्रिती आढाव व शेख इरफान या विद्यार्थ्यांनी पटकावला.मागील 4 वर्षांपुर्वी या स्पर्धेत मुंबईचेच विद्यार्थी सर्वप्रथम यायचे मात्र मुंबई व पुणे यांची ही विजयी परंपरा खंडीत करण्याचे काम अंबाजोगाईच्या पार्थ अ‍कॅडमीने केले व नवा विक्रम प्रस्थापित केला या स्पर्धेत दरवर्षी संपुर्ण देशातून सुमारे 7 ते 8 लाख विद्यार्थी सहभागी होतात.या स्पर्धेचे आयोजन ‘आस्क इंडिया सोसायटी’ तर्फे करण्यात येते.

सलग तिसर्‍या वर्षी अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

पार्थ अ‍कॅडमी तर्फे या वर्षी ही अंंबाजोगाईतील विद्यार्थी नॅशनल हॅण्डरायटींग कॉम्पीटीशन स्कुल हॅण्डरायटींग चॉम्प या स्पर्धेत अंबाजोगाईची श्रीजा कुलकर्णी (ग्रुप ए) या विद्यार्थीनीने 100 पैकी 97 गुण मिळवून तसेच ओमकेश आंधळे (ग्रुप बी-द्वितीय क्रमांक),नॅशनल हॅण्डरायटींग ऑलिम्पीयाड साक्षी संजय आपेट (ग्रुप बी) यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.