परळी:आठवडा विशेष टीम― दुष्काळामुळे महाराष्ट्रात पाणीटंचाईला सर्वांनाच पुढे जावे लागले त्यामुळे गोरगरीब सामान्य जनतेला खूप त्रास झाला दिवस-रात्र पाण्यासाठी वाट पाहावी लागली परळी नगरपरिषद मध्ये 10 महिने पाणीपुरवठा विविध मार्गाने उपलब्ध करून देण्यात आले परंतु वाण धरणाचे नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाई चा फटका सर्वांनाच बसला आहे त्याकरिता सर्व बाबीचा विचार करून महाराष्ट्र सरकारकडे दिनांक 17/ 12 /2019 ला मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे धरणाचे पाणी परळी नगर परिषद अंतर्गत पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी शासनाकडे केली आहे गेल्या वर्ष परळी नगर परिषद पाणीपुरवठा बाबती व्यवस्थित नियोजन वाणधरणाचे
नसल्यामुळे 10 महिने सामान्य जनतेला पाण्यामुळे खूप त्रास झाला आहे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे कारण वाण धरण फक्त 40% टक्केच पाणीसाठा आहे बीड जिल्ह्यामध्ये तसेच परळी-वैजनाथ तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे त्यामुळे पुढील येणाऱ्या काळात पाणीटंचाई चा फटका बसणार आहे परळी मधील आम जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता जिल्हाधिकारी बीड यांना धरणाचे पाणी परळी नगर परिषद व ग्रामपंचायत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा राखीव तात्काळ ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्याची विनंती काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे आशी पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे.