अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

आरटीओ कार्यालयातील गैरप्रकार थांबवा―उज्जैन बनसोडे यांची निवेदनाद्वारे मागणी

अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― शहरालगत असणार्‍या जोगाईवाडी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करून गैरप्रकारांना आळा घालावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उज्जैन बनसोडे यांनी बुधवार,दि.18 डिसेंबर रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयास दिलेल्या निवेदनात उज्जैन बनसोडे यांनी नमुन केले आहे की,वाहन चालविण्याचा कच्चा परवाना (लर्निंग लायसन्स) ऑनलाईन परिक्षा पास करण्यासाठी विशिष्ट रक्कम घेतली जात आहे.ऑनलाईन परिक्षा ही सीसीटीव्ही कॅमेर्‍यासमोर घेणे आवश्यक असताना कार्यालयातील बंद सीसीटीव्ही समोर परिक्षार्थी ऐवजी इतरांना बसवून परिक्षा पास करण्याचे प्रकार सुरू आहेत. कायम परवाण्यासाठी ड्रायव्हींग टेस्ट घेणे आवश्यक असताना अशी टेस्ट घेतली जात नाही.ती मॅनेज केली जाते.प्रायव्हेट अ‍ॅटो नावावर करणे (टी.ओ.) बंद असताना ते ही नावावर करून दिले जात आहेत.वाहनांचे फिटनेस करण्यासाठी गैरप्रकार अवलंबिवले जात आहेत.हे सर्व गैरप्रकार तात्काळ बंद व्हावेत अन्यथा या प्रश्‍नी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा जिल्हा उपाध्यक्ष उज्जैन बनसोडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.सदरील निवेदन माहितीस्तव जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.निवेदन देताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उज्जैन बनसोडे,तालुका सरचिटणीस रविंद्र जाधव,भाजपा अल्पसंख्यांक युवा शहराध्यक्ष अहेमद पप्पुवाले,पत्रकार शेख वाजेद,गणेश सोनवणे, अच्युतराव क्षीरसागर,राहुल राठोड,शेख शफिक,अमर जोगदंड यांची उपस्थिती होती.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.