अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाराजकारण

धर्मांध केंद्र सरकारने आणलेला एनआरसी,कॅब व सीएए कायदा परत घ्यावा―कॉ.बब्रुवाहन पोटभरे ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने व निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―धर्मांध केंद्र सरकारने आणलेला एनआरसी,कॅब व सीएए हा कायदा तात्काळ परत घ्यावा व या बाबत चाललेल्या आंदोलनावरील दडपशाही बंद करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे.या संबंधी त्यांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई
कार्यालयासमोर घोषणा देत, फलक झळकावत निदर्शने केली.व उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार,दि.20 डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या म्हटले आहे की,भारतीय संविधानाने भारतीय नागरिकत्वासाठी धर्म, भाषा,लिंग,जात व वंश यांना कधी आधार मानलेले नाही. बहुभाषिक व बहुधर्मिय, बहुजातीय भारतीय समाजात राज्य घटनेने देशातील माणसास एक नागरिक म्हणुन आधार मानले आहे.त्यानूसार विविध सांस्कृतिक समाज हे भारतीयत्व टिकून आहेत.सांप्रदायिक, जातीय,धर्मांध,फॅसिस्ट विचारसरणी माणणार्‍या भाजपच्या केंद्र सरकारने मुद्दामहून मुस्लिम,आदीवासी व इतर मागास प्रवर्गांना लक्ष करून वरील कायदे भेदभावा पोटी आणले आहेत.हा या देशाच्या संविधावर हल्ला आहे. परिणामी सजग विद्यार्थी,तरूण, भारतीय नागरिक याचा तिव्र विरोध करीत आहेत.त्या विरूद्ध मोदी सरकार आमानुष बळाचा वापर करीत असून त्यामुळे विद्यार्थी व तरूणांचे भवितव्य अंधकारमय करीत आहेत. गोळीबार,अटक,लाठीमार याचा आम्ही धिक्कार करतो व सदरील कायदे तात्काळ परत घ्यावेत अशी मागणी करतो असे या निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे,अनिल ओव्हाळ,छाया तरकसे,धिम्मंत राष्ट्रपाल,अक्षय भुंबे,नितीन सरवदे,लखन वैद्य,अस्मिता ओव्हाळ,पुनमसिंग टाक,वैशाली मस्के यांच्यासहीत इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.