अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

बलात्कारी आरोपीस फाशी द्या―मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन

अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― शहरातील खोलेश्‍वर शाळेतील शिक्षक शाम वारकड याने आपल्याच विद्यार्थीनीवर आमानुष व माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करीत बलात्कार केला.त्या शिक्षकास कायद्याने कठोरात कठोर कारवाई करत फाशी द्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे.या प्रश्नी त्यांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई कार्यालयासमोर घोषणा देत फलक झळकावले.
निदर्शने करून उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार,दि.20 डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शाम वारकड हा शिक्षक शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरणी अटक असून त्याने आकस्मीत केलेला हा गुन्हा नाही म्हणुनच फिर्याद उशीरा आली आहे. विशिष्ट संस्काराची शिकवण देणारे शिक्षक,आमदार, खासदार,भोंदुबाबा हे असे गंभीर प्रकार सर्रास करीत असून स्त्रिया व मुलींना ते करमणुकीचे साधन मानतात.या बाबत संस्था परिसरात कुजबूज असते म्हणून संस्थेला काहीच माहित नाही असे संस्था म्हणुन शकत नाही. या प्रकरणी संगणमताने चाललेल्या गुन्ह्यांचा ही फर्दाफाश व्हावा म्हणुन एलसीबीच्या वर्ग-1 वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत या प्रकरणाची समुळ चौकशी व्हावी अन्यथा येत्या आठ दिवसांत या प्रश्‍नी तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे,अनिल ओव्हाळ,छाया तरकसे,धिमंत राष्ट्रपाल,अक्षय भुंबे,नितीन सरवदे,लखन वैद्य,अस्मिता ओव्हाळ,पुनमसिंग टाक,वैशाली मस्के यांच्या सहीत इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.