अंबाजोगाई तालुकाखेळबीड जिल्हा

आद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रेनिमित्त अंबाजोगाईत सोमवारी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन

नगरपरिषद आणि आद्यकवी मुकूंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा यांचा पुढाकार

अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई नगरपरिषद आणि आद्यकवी मुकूंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व पुढाकाराने आद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अंबाजोगाईत सोमवार,दि.23 डिसेंबर रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील कुस्ती स्पर्धा ही श्री मुकूंदराज स्वामी समाधी परिसर येथे सोमवार,दि. 23 डिसेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा 79 किलो,74 किलो,66 किलो,61 किलो,57 किलो,50 किलो या वजनी गटात व ओपन गटासह लहान मुलांचा खुला गटही स्पर्धेत सहभागी होईल. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह प्रथम,द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देण्यात येणार आहेत.सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत वजन घेतले जातील.तरी मल्लांनी/कुस्ती खेळाडुंनी वेळेत उपस्थित रहावे.पंचाचा निर्णय अंतिम राहील.स्पर्धेचे ठिकाण श्री मुकूंदराज स्वामी समाधी परिसर,अंबाजोगाई (जि.बीड) असे आहे.कुस्ती स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी चंद्रकांतराव लोंढाळ,प्रशांत आदनाक,अशोक देवकर,नगरसेवक अमोल लोमटे,जीवनराव कराड,सुखदेव देवकते,मधुकर खाडे महाराज,
हंसराज हजारे,वसंतराव साळवे,राजेभाऊ डाके,अॅड. अविनाश भोसले,धनंजय भोसले,रंगनाथ पाणखडे यांनी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.