पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

ठाकरे सरकारची कर्ज माफी योजना म्‍हणजे खोदा पहाड निकला चूहा आशीच आहे―पांडुरंग नागरगोजे

पाटोदा:गणेश शेवाळे― निवडणुकीच्या आधी शिवसेनेचा नारा आमचे सरकार आलेकी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असा असताना देखील जनता जनर्धनाने यांना स्वीकारले नाही मात्र सत्तेसाठी काय पण करणाऱ्या शिवसेनेने आपल्या पक्षाची विचार धारा सोडून कशीबशी अभद्र युती करून सत्ता मिळवली असल्या अभद्र युती मुळे पारंपारिक मतदार राजा नाराज झाला पण महाराष्ट्राच्या हितासाठी, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल म्हणून साहेबांनी निर्णय घेतला असेल अंखड महाराष्ट्रातील जनतेला वाटले सारे जन खुश झाले आपल्या साहेबाचे सरकार आले आता सरकार स्थापनेच्या अगोदर प्रत्यक्ष महाराष्ट्राभर सर्वत्र दौरे करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मिळतील आपला सातबारा कोरा होईल आशेने शेतकरी राजा सत्ता स्थापन केला पासून ते अधिवेशन संपेपर्यत टीव्ही वरील बातम्या वर टक लावून पाहू राहिले माञ महाविकास आघाडी सरकारने फक्त दोन लाख रुपया पर्यतचे कर्जे माफ केल्याने तसेच अतिवृष्टीमुळे बांधीत झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे महापाप शिवसेनेने सत्तेत आले की शेतकऱ्यांना दिलेल्या शब्द विसरून केले असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी घोषणा म्हणजे खोदा पहाड निकला चूहा सारखीच आहे अशी खरपूस टीका सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग नागरगोजे यांनी केली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.