औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगावच्या गेट टुगेदर पद्मश्री ना.धो महानोर यांची पुस्तके सप्रेम भेट

सोयगाव:आठवडा विशेष टीम―
तीस वर्षापूर्वी शाळा सोडलेल्या सोयगावच्या विद्यार्थ्यांनी रविवारी पुन्हा एक दिवसीय शाळा भारावून घेतलेल्या गेट टुगेदर कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेला ग्रंथालय सप्रेम भेट देत त्या ग्रंथालयात पद्मश्री निसर्ग कवी ना.धो महानोर यांच्या पुस्तकांची मांदियाळी केल्याने पुन्हा ग्रामीण विद्यार्थ्यांना ना.धो महानोर यांची पुस्तके वाचायला मिळणार आहे.
सोयगाव शहरातील तीस वर्षापूर्वी एकाच शाळेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रमात शाळेला ग्रंथालय उभारून दिले असून या ग्रंथालयात निसर्ग कवी ना.धो महानोर यांच्या पुस्तकांसह इतर ३०० पुस्तके भेट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.१९८९ मध्ये शाळा शिकत असतांनाचे बालपण पुन्हा रविवारी या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनुभवले असून या कार्यक्रमात उच्च पदावर गेलेल्या अनेकांनी आपले अनुभव कथन केले.पुढील पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सुसज्ज ग्रंथालय उभारून दिले आहे.या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या माजी सेवानिवृत्त झालेल्या ९ शिक्षकांचा सत्कार केला या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण अधिकारी गुरव यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे मधुकर अहिरे,लक्षमण रोकडे,वामने,डी,सी पाटील.एम.के पाटील,चौधरी,साळवे,शेटे आदींची उपस्थिती होती.या विद्यार्थ्यांच्या वेळेस चे मयत झालेल्या दहा शिक्षक आणि पाच विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.माजी वियार्थ्यांमध्ये विविध पदावर गेलेल्या विजय अहिरे,इंद्रजीत खस,सारंग देशमुख,चंद्रशेखर कडेवाल,रतन फुसे,संतोष वाडेकर,राजेंद्र शिनकर,विठ्ठल काटोले,दिलीप शिंदे,वैशाली महानोर,अनिता शिंदे,अर्चना हजारी,आशा सोहनी,ज्योती पाखले,ललिता रगडे.माया पठाडे,निर्मला सोनवणे,परवीन पठाण,संगीता बावस्कर,सुनिता श्रीखंडे,सुरेखा पगारे,संगीता मालोदे,संगीता पोटे,शिवाजी इंगळे,सुनील गोतमारे,सारंग बागले,बाबू शहा,कदीर देशमुख,जाफर पठाण,बबलू काळे,योगेश दुसाने,दिलीप चौधरी आदींसह ६३ माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पूजा माळवदे,वैशाली महानोर यांनी दिली पुस्तकांची भेट-

वैशाली महानोर,पूजा माळवदे यांनी शाळेत उभारण्यात आलेल्या सुसज्ज ग्रंथालयाला स्वखर्चातून विविध पुस्तके भेट म्हणून दिली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.