औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव पंचायत समितीच्या निवडीचा मुहूर्त वर्षाअखेरीस

सोयगाव,ता.२३:आठवडा विशेष टीम―
सोयगाव पंचायत समितीच्या सभापती,उपसभापती निवडीची मुदत निश्चित करण्यात आली असून मंगळवारी (ता.३१)डिसेंबरला सोयगाव पंचायत समितीच्या निवडीचे पत्र सोमवारी ता.२३ सोयगाव पंचायत समितीला प्राप्त झाले असून याबाबतच्या सूचना नोटिसांचे पंचायत समिती सदस्यांना वितरण करण्यात आले आहे.
सोयगाव पंचायत समितीचे आरक्षण मागील आठवड्यात जाहीर करण्यात आले असून महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोयगावचे सभापती पद राखीव झाले आहे.त्यामुळे वर्षा अखेरीस सोयगाव पंचायत समिती सभापती,उपसभापती निवडीचा धुराला उडणार असून अध्यासी अधिकारी ब्रजेश पाटील,सहायक अधिकारी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ता.३१ डिसेंबरला पंचायत समितीच्या विशेष सभा बोलावण्यात आली आहे.मंगळवारी ता.३१ डिसेंबरला सकाळी दहा ते दुपारी बारा पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत असून दुपारी दोन वाजेला बचत भुवनचं सभागृहात निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

सोयगाव पंचायत समितीवर पक्षीय बलाबल-

भाजप-२,शिवसेना-चार,राष्ट्रवादी काँग्रेस-शून्य अशी असून शिवसेनेलाच संधी मिळणार असल्याचे राजकीय चित्र आहे.त्यामुळे बनोटी गणाच्या प्रतिभा जाधव आणि फर्दापूर गणाच्या रस्तुलबी पठान यांची नावे चर्चेत आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड(ता.३) जाहीर झालेली असून त्यासाठी सोयगाव तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद सदस्यांना याबाबतच्या नोटीसा वितरण करण्यात आल्या आहे .सोयगाव तालुक्यात आमखेडा गट-पुष्पाताई काळे,फर्दापूर गट-गोपीचंद जाधव,आणि बनोटी-गोंदेगाव गट-मोनाली राठोड,या तीनही सदस्यांना सूचना नोटीसा देण्यात आल्या आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.