बीड जिल्हा

आज ईश्वरभारती विद्यालय वाघिरा येथे पालक,विद्यार्थी व शिक्षक मेळावा यशस्वीरित्या पार पडला

आठवडा विशेष|अक्षय बांगर

वाघिरा(पाटोदा) दि.२५ :आज शुक्रवार दिनांक २५/०१/२०१९ रोजी वाघिरा येथिल ईश्वरभारती विद्यालयात पालक,विद्यार्थी व शिक्षक मेळाव्याचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी शाळेचे मु.अ. खिल्लारे मॅडम होत्या.

मुलांनी चहा ,कॉफी ,भेळ ,मिसळपाव ,गुलाबजाम ,समोसा ,वडापाव ,किराणा-काही वस्तू , पुस्तके आनली होती त्यामधून खरेदी-विक्री ,नफा ,खरी कमाई याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला.

विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्रावीण्य मिळविण्यात मदत करावी म्हणजे वेळ वाया जात नाही. कोणालाही नैराश्य येणार नाही.शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते गुरू-शिष्याचेच असते. अशा इत्यादी विषयांवर चर्चासत्र झाले. विद्यार्थी समस्या ,परिक्षा पध्दत ,विद्यार्थी मुलभूत विकास यावर चर्चा केली गेली.तसेच यावेळी महिलांची संगीत खुर्ची हा कार्यक्रम घेण्यात आला.

मु.अ.खिल्लारे मॅडम ,मोरे सर ,झोडगे सर ,कुदळे सर ,पोकळे सर ,मिसाळ सर ,गायकवाड सर ,जाधव मॅडम ,तेलप सर ,तसेच किशोर वाघमारे, शंकर सोनुळे,नवनाथ वायभट यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

[su_youtube url="https://youtu.be/gyU2StfRDVA" width="300" height="200" autoplay="yes"]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.