ब्रेकिंग न्युज

एरंडोल जवळ भीषण अपघातात 9 ठार, एरंडोलच्या इतिहासात काळा दिवस

एरंडोल: किशोर पाटील कुंझरकर―एरंडोल जवळील पाच किलोमीटर अंतरावर वरील हॉटेल गौरी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भडगाव ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहन कालीपिली ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 9 प्रवासी गंभीर जखमी झाल्याने संपूर्ण शहरात दुखाचे वातावरण पसरले मृतांमध्ये एरंडोल येथील एकाच वंजारी परिवारातील पती-पत्नीस मुलाचा समावेश असून काली पिली चालकाचा समावेश आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,काल दिनांक 23 रोजी दुपारी तीनच्या सुमारास धुळे कडून जळगाव कडे जात असलेल्या ट्रकने MH 15 G 8474 समोरून जळगाव कडून एरंडोल कडे येत असलेल्या प्रवासी वाहन काली पिली एमएच 19 वाय52 07 ला जोरदार धडक दिली .ट्रकचा पाटा एक्स एल तुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात असून यात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूला विदारक चित्र होते. नऊ प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत अपघाताचा आवाज एवढा जोरात होता की परिसरातील शेतात काम करीत असलेले शेतकरी व शेतमजूर यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त वाहनातून जखमी व ठार झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस ,राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी मदत केली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अपघातामध्ये ठार झालेल्यांची नावे

निवृत्ती प्रभाकर वंजारी वय 47 राहणार गांधीपुरा एरंडोल, उज्वला निवृत्ती वंजारी वय 40 राहणार गांधीपुरा एरंडोल व प्रसन्न निवृत्ती वंजारी y10 राहणार गांधीपुरा एरंडोल. या एकाच कुटुंबातील पती पत्नी व मुलासह अपघातात प्रवासी वाहन चालक नितीन उर्फ पिंटू माधव सोनार 46 राहणार पाटील वाडा एरंडोल परमेश्वर नाना माळी वय 23 राहणार नागोबा मढी एरंडोल, काशिनाथ शंकर पाटील y68 राहणार चिमनपुरी पिंपळे तालुका अमळनेर भानुदास महादेव जाधव वय 65 राहणार वैतागवाडी एरंडोल यांचेसह ह् एक अनोळखी महिला व पुरुष यांचा समावेश आहे.

अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे

यासीन हायात खान पठाण वय 25 राहणार एरंडोल .उषाबाई संजय महाजन वय 55 साहिल शेख राजू 22 धुळे किशोर मोतीलाल तोटी राहणार नाशिक मिठाराम श्रावण आरके वय 55 राहणार एरंडोल गिताबाई मधुकर देशमुख वय 65 राहणार तळ ई तालुका एरंडोल विठ्ठल महाजन वय 50 राहणार एरंडोल पुष्‍पाबाई पूर्ण नाव माहीत नाही आणि एका गंभीर जखमी चे नाव कळू शकलेले नव्हते.
वंजारी परिवार उद्ध्वस्त झाला
या भीषण अपघातात एरंडोल येथील वंजारी परिवारातील निवृत्ती वंजारी वय 47 जळगाव एरंडोल कडे जाण्यासाठी बसले होते यांचे समवेतमुलगा प्रसन्न व पत्नी उज्वला निवृत्ती वंजारी या होत्या. परंतु क्रूर काळाने या भीषण अपघातातून त्यांना हिरावून नेले. आणि निवृत्ती वंजारी चा संपूर्ण परिवार उध्वस्त झाला या विदारक चित्राने उपस्थित सर्वांची मन हेलावत होते. रात्री उशिरा अकरा वाजता एरंडोल कॉलेजजवळील स्मशानभूमीत वंजारी परिवारातील तिघांवर अंत्यसंस्कार अतिशय हृदयद्रावक परिस्थितीत करण्यात आ ले. दुःख लाही दुःख होईल असा अतिशय वाईट हा प्रसंग होता. या भीषण अपघातात मृत्युमुखी झालेले निवृत्ती वंजारी हे भाजपा परिवारातील सक्रिय सदस्य होते.अतिशय शांत मनमिळावू व कधीच कुठल्याही प्रकारची घाई न करणार व्यक्तिमत्त्व म्हणून ते एरंडोल शहरात परिचित होते.

देश सेवेचे स्वप्न भंग

मृतांमध्ये परमेश्वर नाना महाजन वय २३ या युवकांचा समावेश आहे .सीमा सुरक्षा दलात परमेश्वर ची नुकतीच त्यांची निवड झाली होती व ते लवकरच प्रशिक्षणाला जाणार होते, परमेश्वराला परमेश्वराने अपघातातून मित्रपरिवारासह कुटुंबियांपासून हिरावून नेले आणि त्यांचे देशसेवेची स्वप्नभंग अपूर्णच राहिल्याने सर्व तरुण मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत होती व त्यांचा मोठा मित्रपरिवार ग्रामीण रुग्णालय एरंडोलयाठिकाणी उपस्थित होता. यावेळी सारेजण अवैध प्रवासी वाहतूक तसेच रस्त्यांवरील खड्डे याविषयी देखील तीव्र भावना व्यक्त करत होते.
देव तारी त्याला कोण मारी
या अपघातामध्ये एरंडोल येथीलग्रामीण रुग्णालयात साधारण ४ वर्षे वयाची मुलगी सिमरन उर्फ बबीता ला पाहून साऱ्यांचे डोळे पाणावत होते. ग्रामीण रुग्णालयातील नर्स प्रतिभा चौधरी यांच्या कुशीतअसलेली ही मुलगी तिच्या आई-वडिलांना शोधत होती. तपास केला असता असे कळले की, मध्यप्रदेश येथील पावरा परिवारातील ही मुलगी असून तिचे नाव सिमरन उर्फ बबीता आहे.आई वडील उत्रान येथील नीलोंस कंपनीत कामाला आहेत.छोटेलाल दूधभाणसा हे पत्नी व मुलगी सिमरण वय4 यांच्यासोबत नीलोंस कंपनी कडे जात असताना अपघात होऊन संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी झाले मात्र चार वर्षाच्या मुलांना साधे खरचटले नाही ती सुखरूप होती.देव तारी त्याला कोण मारी चा प्रत्यय या ठिकाणी पुन्हा एकदा आला.
अपघातात मयत झालेले काशिनाथ शंकर पाटील हे पिंपळकोठा येथे आपले पुतणी कडे गेले होते. काळाने त्यांच्यावर झडप घातली.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  नशिबाचा असाही फेरा

  अपघात ग्रस्त झालेल्या कालीपिली चे चालक नितीन उर्फ पिंटू माधव सोनार वर्षे 40 राहणार पाटील वाडा एरंडोल हे अपघातग्रस्त झालेल्या काली पिली चा मालकांकडे गंध मुक्त उत्तर कार्याच्या कार्यक्रम असल्याने त्या दिवशी कालीपिली चालवत होते नशीबाचा असाही फेरा आला .

  अपघात झाल्यापासून तर रात्री अकरा वाजता अंत्यविधी पर्यंत एरंडोल येथे भाजपचे विभागीय संघटनमंत्री ऍड किशोर काळकर , नगराध्यक्ष रमेश परदेशी व सर्व नगरसेवक, भाजपा तालुकाध्यक्ष एस आर पाटील, सचिन पानपाटील,संपुर्ण भाजपा परिवार उपस्थित होता. अपघात झाल्याझाल्या सोशल मीडियावर हे वृत्त येताच ग्रामीण रुग्णालयकडे अनेकांनी धाव घेतली. संजय गांधी निराधार योजनेचे सुनील पाटील माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले रवी अण्णा महाजन तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय अण्णा महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील, उपनगराध्यक्ष बबलू पहिलवान चौधरी, पवार राजेंद्र शिंदे प्रताप पवार सचिन विसपुते नगरसेवक जहिरोद्दीन शेख कासम, बाजीराव पांढरे, शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, भाजपा जळगावचे राजेंद्र घुगे पाटील, पिंटू राजपूत, निलेश परदेशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगदीश ठाकुर, बाळू वंजारी, विठ्ठल वंजारी, एडवोकेट मधुकरदेशमुख, आदीसह एरंडोल शहर व तालुक्यातील सर्वच दैनिकाचे पत्रकार तसेच पारोळ्याचे देखील पत्रकार बांधव उपस्थित होते.शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय सर्वस्तरीय कार्यकर्त्यांनी एरंडोल येथे जखमींना रुग्णालयात मदतीसाठी घेतलेली धाव माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन घडवत होते. एरंडोल पोलीस स्टेशनचे पीआय अरुण हजारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे तातडीने घटनास्थळी रवाना अपघातग्रस्त ट्रक टपालाची साहित्य घेऊन जात होता व त्याचा एक्सेल तूटल्याचे लक्षातआले. एरंडोल पोलीस स्टेशनचे अरुण हजारे साहेब व त्यांचे सर्व सहकारीपोलीस कर्मचारी सुभाष धाबे सुनील लोहार अनिल पाटील निलेश ब्राह्मणकर संदीप सातपुते मनोज पाटील यांनी मदत केली. पोलीस उपविभागीय अधिकारी हेदेखील ग्रामीण रुग्णालयात तळ ठोकून होते.
  ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलासपाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर अहिरे, किरण पाटील व त्यांच्या सर्व टीमने सर्व रुग्ण व नातेवाईकांना तातडीने मदत उपचार व दिलासा दिला.
  जळगाव येथे अपघातग्रस्तांना एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन आरोग्यदूत अरविंद देशमुख आदींनी तातडीने मदत केली.
  एरंडोल च्या इतिहासात या भीषण अपघातांना सर्वांचे मन सुन्न करून एकाच वेळी गावातील सहा जणांच्या जाण्याने नियतीने काळा दिवस घडविला.
  जीवन हे क्षणभंगुर असून कुठल्याही वेळी जीवनात दुर्घटना होऊन होत्याचे नव्हते होते यासह अनेक प्रकारच्या भावना यावेळी उपस्थित व्यक्त करत होते.
  या अपघाताच्या मुळे अवैध वाहतूक सह, व्यक्तिगत जीवनातील हरवत चाललेली शिस्त आणि जीवनाच्या सुरक्षिततेकडे धकाधकीच्या स्पर्धेच्या जगात सारेजण अप्रत्यक्षरीत्या करत असलेले दुर्लक्ष प्रकर्षाने खुणावत होते.
  शासनाकडून मृतांना मदत जाहीर होईलही परंतु कुटुंबात निर्माण झालेली पोकळी दूर होणार नाही. यासाठी समाजव्यवस्था व धोरणकर्त्यांनी रस्त्यावर सर्वसामान्यांचे जीवन सुखकर कसं होईल यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. घटनेचे वृत्त कळताच मतदारसंघाचे आमदार चिमणराव आबा पाटील, माजी मंत्री नामदार गुलाबराव पाटील, माजी आमदार डॉक्टर सतीश अण्णा पाटील, आदींसह जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दूरध्वनीवरून घटने बद्दल रुग्णालयात विचारपूस केली. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे डीवायएसपी राजेंद्र ससाने यांनीदेखील एरंडोल येथे घटनास्थळी भेट देऊन रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात उपस्थिती दिली.एरंडोल शहर शिवसेनेचे नगरसेवक कृणाल रमेश महाजन त्यांनी जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात पोचविण्या सह जळगाव येथील जखमींना जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात तरुण सहकाऱ्यांसह केलेली मदत लक्षवेधी ठरली.
  अपघातग्रस्त ट्रक जमा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.