कवी,रसिक व वाचक तयार व्हावेत यासाठी ‘काव्यसिंधु’ संमेलन-प्रख्यात कवी दिनकर जोशी
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― काव्यसिंधू राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या आयोजनाबाबत बोलताना सांगितले की,संयोजक राजकिशोर मोदी यांचे पुढाकाराने बिना चेह-यांची माणसे एकञ जमवायची, एकमेकांशी मुक्त संवाद साधायचा,परस्परांना जाणून घ्यायचे,त्यांचे साहित्यानुभव ऐकायचे, आद्यकवि मुकूंदराज यांचेमुळे कवितेची जुळलेली नाळ कायम ठेवून भौतिकता टाळून साधेपणाने कवि आणि त्याची कविता समजून घेण्याचा हा कवितेचा उपक्रम आहे.या कवी संमेलनातून कवी,रसिक व वाचक तयार व्हावेत कारण कवी संमेलन ही करमणूकीची गोष्ट नाही तर ती गंभीरपणे समजून घेण्याची गोष्ट असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांनी केले.
अंबाजोगाईत महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींची तीन कवी संमेलने झाली.यासाठी प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाने पुढाकार घेतला होता.येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील कवींचे काव्यसिंधू हे राज्यस्तरीय कवी संमेलन रविवार,दि.22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत नगर परिषदेच्या लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात संपन्न झाले.
“काव्यसिंधू” हे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे उदघाटन प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,साहित्यिक क्षेत्रातील जानकार भगवानराव शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी,प्रख्यात कवि प्रभाकर साळेगावकर (माजलगांव),डॉ.संजय बोरुडे (अहमदनगर), कादंबरीकार रचना स्वामी (अहमदनगर) यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व आद्यकवि मुकूंदराज स्वामी यांच्या प्रतिमापुजनाने झाले. उदघाटन सञात सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांनी प्रास्ताविक केले.तर प्रख्यात कवि प्रभाकर साळेगावकर (माजलगांव), डॉ.संजय बोरुडे (अहमदनगर), कादंबरीकार रचना स्वामी (अहमदनगर) भगवानराव शिंदे (अंबाजोगाई) यांनी मनोगत व्यक्त केले.आद्यकवी मुकुंदराज यांचा वारसा सांगणार्या अंबाजोगाईमध्ये आद्यकवींच्या यात्रेनिमित्त काव्यसिंधू या महाराष्ट्रातील कवींच्या तीन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.तर स्थानिक विद्यार्थी कवींचे ही एक कवी संमेलन अशी एकूण 3 कवी संमेलने झाली.या प्रत्येक कविसंमेलनाला काव्य सरिता असे संबोधण्यात आले होते. प्रारंभी काव्यसरिता-1 कवीसंमेलाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर साळेगावकर, (माजलगाव) हे होते.या कवी संमेलनात प्रेमा कुलकर्णी बालाप्रसाद चव्हाण,खेळबा काळे,स्मिता लिंबागावकर, लता जोशी,संध्या शिंदे,गौरी सुहास देशमुख,हे कवी सहभागी झाले. सर्वच कविनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.कविंनी शेती, शेतकरी,स्ञी,समाज व्यवस्था, संस्कृति,माय मराठी,आरक्षण आदींसह विविध ज्वलंत व वास्तववादी विषयांवर मौलिक भाष्य करून सभागृहाला मंञमुग्ध केले.महाराष्ट्राच्या विविध भागातून येत उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.”काव्यसरीता -2″ च्या अध्यक्षस्थानी डॉ.संजय बोरुडे (अहमदनगर) हे होते.या कवि संमेलनात दिनकर जोशी, प्रविण काळे,गोविंद रोकडे, गोरख शेंद्रे, अर्चना स्वामी,मिना आदमाने,नागनाथ बडे,सुजाता भोजने या कविंनी सहभाग नोंदवला.याही कवि संमेलनात वास्तवादी काव्य रचना सादर करण्यात आल्या.विशेषतः डॉ.संजय बोरुडे व दिनकर जोशी यांच्या काव्य रचनाना रसिक श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.कवी डॉ.संजय बोरुडे यांनी ‘आदिवासी स्त्री’ चे मनोगत आपल्या कवीतेतून सादर केले. त्याच्या या गित रचनेला सभागृहाने मनमुराद दाद दिली. डॉ.बोरुडे आपल्या गितात म्हणतात.
“रान हासलं गालात,पाणी लाजना तळ्यात.
त्यांच्या नावाचं डोरलं जवा बांधीन गळ्यात”
या गीतातून आदिवासी मुलीचे मनोगत,विवाह,प्रेम,भावना बाबतचे भाष्य त्यांनी सभागृहासमोर ठेवले उपस्थित रसिक श्रोत्यांनी डॉ.बोरुडे यांच्या गिताना उत्स्फुर्त दाद दिली. तसेच ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर,दिनकर जोशी यांच्या जीवनातील विविध छटांचे चित्रण करणार्या कवितांना ही रसिकांची मनमुराद दाद मिळाली.स्मिता लिंबगावकर पांडे-‘वागेन मी तशी’,संध्या शिंदे-‘नसतं हेरल मी एखादं श्रद्धास्थान’,प्रविण काळे- ‘बालकविता’,गौरी सुहास देशमुख-‘मी पुन्हा येईन’,खेलबा काळे-‘बालकविता’,लता जोशी -‘पती-पत्नीच्या’ नाते संबंधावर भाष्य करणारी कविता,सुजाता भोजणे-‘तु’,गोविंद रोकडे – ‘सहचारणीच्या वेदना’ व्यक्त करणारी कविता,प्रेमा कुलकर्णी -‘तान्हुला’,अर्चना स्वामी – ‘विडंबन काव्य’,बालाप्रसाद चव्हाण-‘निसर्गाचा प्रकोप’, गोरख शेंद्रे -‘म्हातारी उडत चालली’,नागनाथ बडे-‘चिमीची दैना’ आदि कवीता सादर झाल्या सर्व कविंच्या रचनांना सभागृहाने उत्तम दाद दिली.
काव्यसिंधु’ या राज्यस्तरीय चार कवि संमेलनांचा समारोप प्रख्यात कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या “विठ्ठलाशी संवाद”,”आम्ही ठाकरं-ठाकरं” या विडबंन गिताने झाला. उपस्थितांचे आभार मानताना दिनकर जोशी यांनी,”मेहंदीने सजले हात,माझ्या सासरच ऊन” या दोन बहारदार रचना सादर केल्या.त्यांच्या कवितेला रसिक-श्रोत्यांनी उत्स्फुर्त दाद दिली.रसिकांनी काव्य सरीता 1 ते 3 या राज्यस्तरीय कवी संमेलनास महाराष्ट्रातील विविध विभागातून पन्नासहून अधिक कवि आणि कवयिञी तसेच स्थानिक 35 बालकवी यांनी उपस्थित राहून आपल्या रचनांचे बहारदार सादरीकरण बाल कविच्या कवि संमेलनाचे अध्यक्षपद रचना स्वामी यांनी भुषविले.तर सुत्रसंचालन अर्चना स्वामी यांनी केले.तर रसिक- श्रोत्यांनी सर्वच कवींच्या कवितांना उत्स्फुर्त व भरभरून दाद दिली.”काव्यसिंधू राज्यस्तरीय काव्य” संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, संयोजन समितीचे प्रमुख दिनकर जोशी यांचे मार्गदर्शनाखाली राजेश कांबळे, आनंद टाकळकर,सि.व्ही. गायकवाड यांचेसह प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार व परीश्रम घेतले.यावेळी सखा गायकवाड,भारत सालपे, जनार्धन सोनवणे यांच्यासह कवि साहित्यिक उपस्थित होेते.