न्यु व्हिजन पब्लिक स्कुलचे 16 वे वार्षीक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरे

न्यु व्हिजन पब्लिक स्कुल मधून अधिकारी व कलावंत निर्माण व्हावेत- उपजिल्हाधिकारी शोभा जाधव

न्यु व्हिजनच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास-प्राचार्य जी.रमेशराव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलने बीड जिल्ह्यात दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा मोदी पॅटर्न निर्माण केला असून सर्व प्रकारचे शिक्षण एकाच छताखाली मिळवून देणारी जिल्ह्यातील ही एकमेव संस्था आहे.अंबाजोगाई शहराच्या सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरेला साजेसे काम राजकिशोर मोदी हे करीत आहेत.कवि शांता शेळके,मंगेश पाडगावकर यांच्या गित, कवितांचा संदर्भ देत या संस्थेतून उत्तम कलावंत,क्रिडापटू व अधिकारी निर्माण व्हावेत चांगला माणूस हा चांगला समाज घडवू शकतो.कला हे व्यक्त होण्याचा सशक्त माध्यम असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले.त्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या 16 व्या वार्षीक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होत्या.

16 व्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त शनिवार,दि.21 डिसेंबर रोजी न्यु व्हिजन पब्लिक स्कुलने ‘व्हिस्टा-2019’ हा स्वच्छ भारत,हरित भारत हा पर्यावरणपुरक संवर्धनाचा मौलिक संदेश देणारा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत व विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले सुप्तगुण, कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जी रमेशराव (जवाहर नवोदय विद्यालय, लातूर) तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच. थोरात,अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, प्रकाश सोळंकी,डॉ.नवनाथ घुगे, डॉ.संदिप थोरात,प्राचार्य एम.बी. शेट्टी,प्रा.पी.ए.कुलकर्णी, डॉ. विवेकानंद राजमान्य,प्रा.एस.ए. बिराजदार,धनराज सोळंकी तसेच पालक प्रतिनिधी डॉ. नवनाथ घुगे,अ‍ॅड.संतोष पवार, प्रा.सविता बनाळे,शाळेचे प्राचार्य रोशन पी.नायर,दिनकर जोशी, नगरसेवक मनोज लखेरा, कचरूलाल सारडा,नारायणराव केंद्रे,संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी,भूषण मोदी,सुरेश मोदी,विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव शिंदे व विद्यार्थीनी प्रतिनिधी जान्हवी चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी राष्ट्रगीत व स्वागतगीत झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर स्वागतपर भाषण करून प्राचार्य रोशन पी.नायर यांनी अहवाल वाचन केला.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या जडणघडणीत योगदान देणारे परमप्रिया गायकवाड,आनम्मा मलशेट्टी, दानम्मा बेटगिरी,शिल्पा पौळ, तनुजा पुर्णेकर,श्‍वेता निकम, सुरेखा धावडकर,शिवकांत बेटगिरी,कावेरी शिंदे,अमोल कुलकर्णी,शैलेष गारठे यांचा सन्मान केला.तर बाबुराव केंद्रे यांना ‘जिवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘बेस्ट स्टुडंट ऑफ स्कुल’ हा अ‍ॅवार्ड वैष्णवी मदने,’बेस्ट स्टुडंट ऑफ दि हॉस्टेल’ हा अ‍ॅवार्ड सार्थ बाचावार तसेच ‘बेस्ट स्पोर्टमॅन’ हा अ‍ॅवार्ड संकेत उघडे,’बेस्ट प्रिसीस्ट’ हा अ‍ॅवार्ड पार्थ देशमुख या विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आला.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधिका तापडिया व ऋषिराज चिर्ची या इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी केले.तर उपस्थितांचे आभार विद्यार्थीनी साक्षी धिंगाणे व विद्यार्थी पार्थ देशमुख यांनी मानले.उद्घाटन कार्यक्रमानंतर न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपले विविध कलाविष्कार,वैयक्तीक नृत्य,समुह नृत्य सादर केले. छोट्या एकांकीका,गीते, गीतांमधील सर्व प्रकार इंग्लीश कविता,मराठी,हिंदी, इंग्रजी गाण्यांचे,क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारे,सैनिकी, गोंधळी वेशभूषतील गिते, पंजाबी,काश्मिरी यासहित भारतीय विविध भाषेतील गितांचे बहारदार सादरीकरण केले.यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील अभय चामनर या विद्यार्थ्यांने भारतीय स्वतंत्र्यापूर्व चळवळीचा इतिहास उलगडून सांगितला. त्याच्या एकपात्री अभियानाला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.बाल विद्यार्थ्यांनी केलेल्या सामुहिक नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराचे व नेटक्या नियोजनाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या वार्षीक स्नेह संमेलनासाठी शहराच्या नगराध्यक्ष सौ.रचनाताई सुरेश मोदी, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन सुनिता राजकिशोर मोदी यांचीही उपस्थिती होती. तर वार्षीक स्नेह संमेलनाच्या यशस्वितेसाठी कार्यकारी संचालक संकेत मोदी,संस्था अध्यक्ष भुषणजी मोदी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षका,कार्यालयीन कर्मचारी, सेवकवर्ग आदींनी पुढाकार घेतला.प्रारंभी माहीतीपटाद्वारे न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या प्रगतीचा आढावा घेतला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.