आठवडा विशेष टीम―गेली दोन वर्षे मी अनेक कारखान्यावरील कोपीना भेटी देत असताना या कोपीवर महिलांसाठी कोपीवर टॉयलेट नाहीत. त्यावेळी मी अनेक कारखाने व साखर आयुक्त यांना निवेदन दिलेली आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले होते. काही कारखान्यावर फिरते टॉयलेट बसवण्यात आले होते. परंतु अनेक कारखान्यावर महिलांसाठीही टॉयलेट नाहीत. यामुळे महिलां टॉयलेटला जाणे गरजेचे असताना अंधार पडण्याची वाट पहात थांबतात यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. लाखो टॉयलेट बांधले असा गाजावाजा सरकारने याकडे अत्यंत दुर्लक्ष केलेले आहे.
आम्ही माननीय साखर आयक्त यांना पुन्हा निवेदन देत आहोत आणि 25जानेवारी पर्यंत जर प्रत्येक कारखान्यावर टॉयलेट झाले नाही तर ओबीसी फौंडेशन इंडिया, युवा आघाडी, साखर आयक्त पूणे यांच्या ऑफिस समोर 25जानेवारी रोजी शौचास बसेल. असा इशारा स्वातीताई मोराळे संघटक स्वातीताई मोराळे सखी मंच, राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी फौंडेशन इंडिया यांनी दिला आहे.