अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

प्रियदर्शनी क्रिडा मंडळाच्या वतीने 5 ते 11 जानेवारीला तालुकास्तरीय बालझुंबड-2020 चे आयोजन

बालझुंबड उपक्रमात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे-संयोजक राजकिशोर मोदी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने ‘बालझुंबड-2020’ चे आयोजन अंबाजोगाई शहरात दिनांक 5 ते 11 जानेवारी 2020 या कालावधीत करण्यात आले आहे.दरवर्षी बालझुंबड हा उपक्रम तालुकास्तरावर आयोजित करण्यात येतो. यावर्षीही अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व शाळांनी बालझुंबड उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी व सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात राजकिशोर मोदी व दिनकर जोशी यांनी नमुद केले आहे की,मागील 19 वर्षांपासून बालझुंबड हा उपक्रम अंबाजोगाई शहरातील सर्व शाळांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत.बालझुंबडचे हे 20 वे वर्ष आहे.हा उपक्रम तालुकास्तरावर आयोजित केला जात असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात येत आहे.अंबाजोगाई तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी यातुन मिळणार आहे.क्रिडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या तयारीत असुन उपक्रम शिस्तबद्धरित्या होण्यासाठी सज्ज झाले आहेत.स्पर्धेचे वैशिष्ट्येपुर्ण नियोजन करून यावर्षी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत.रंगभरण व चित्रकला,कथाकथन,सायन्स सर्च,क्वीझ काँम्पिटेशन,पी.पी. टी कॉम्पिटेशन,वैयक्तिक नृत्य, समुहनृत्य आदी सात विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन हे बालझुंबडचे वैशिष्ट्ये आहे.
बालझुंबड-2020 या उपक्रमांतर्गत रविवार,दि.5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा होणार असून 1 ली ते 2 री व 3 री ते 4 थी या गटात रंगभरण स्पर्धा घेतली जाणार आहे.सकाळी 12 वाजता इयत्ता 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी या गटात चित्रकला या दोन्ही स्पर्धा न्यु व्हिजन पब्लिक स्कुल रिंग रोड, अंबाजोगाई येथे होणार आहेत. सोमवार,दि.6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता इयत्ता 3 री ते 4 थी गटात कथाकथन स्पर्धा होणार असून ही स्पर्धा जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय,गुरूवार पेठ येथे होणार आहे.मंगळवार,दि.7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता इयत्ता 5 वी ते 7 वी व दुपारी 1 वाजता इयत्ता 8 वी ते 10 वी या गटात सायन्स सर्च ही स्पर्धा यु व्हिजन पब्लिक स्कुल रिंग रोड,अंबाजोगाई येथे होणार आहे.बुधवार,दि.8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता क्वीझ कॉम्पीटीशन ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी या गटात न्यु व्हिजन पब्लिक स्कुल रिंग रोड,अंबाजोगाई येथे होणार आहे.गुरूवार,दि.9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पी.पी.टी.कॉम्पीटीशन ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी या गटात न्यु व्हिजन पब्लिक स्कुल रिंग रोड,अंबाजोगाई येथे होणार आहे.शुक्रवार,दि.10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता इयत्ता 1 ली ते 4 थी गट,दुपारी 1 वाजता इयत्ता 5 वी ते 7 व गट व दुपारी 3 वाजता इयत्ता 8 वी ते 10 वी गट या मध्ये वैयक्तीक नृत्यस्पर्धा लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात होणार आहे. शनिवार,दि.11 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता इयत्ता 1 ली ते 4 थी,5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी या गटात समुहनृत्य स्पर्धा ही आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी होणार आहे.वरील सर्व स्पर्धा तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. सर्व स्पर्धा विनामुल्य आहेत. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.स्पर्धकांनी आपला संपर्क क्रमांक नोंदणी विभागात नोंदवावा.प्रवेशाचा अंतिम दिनांक हा 4 जानेवारी 2020 असा आहे. बालझुंब्बडच्या यशस्वितेसाठी संयोजक तथा प्रियदर्शनी क्रिडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांचे मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकर्ते नगरसेवक सुनिल व्यवहारे,विशाल जगताप, प्रा.आनंद कांबळे,भिमाशंकर शिंदे,सचिन जाधव तसेच समन्वयक राजेश कांबळे,चंद्रकांत गायकवाड, आनंद टाकळकर,विनायक मुंजे यांनी पुढाकार घेतला आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.