बीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब जयंती निमित्त वडवणी येथे भव्य होमिओपॅथिक शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; 160 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

वडवणी:आठवडा विशेष टीम―
वडवणी शहरातील श्रीनाथ क्लिनिक व बाबरी मुंडे मित्र मंडळ तसेच रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन दि. 28 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. या शिबिरादरम्यान मुतखडा, मुळव्याध, गजकर्ण, केस गळती, बालदमा, स्त्रियांचे आजार, थायरॉइडचे आजार, अशा अनेक आजारावर ती उपचार करण्यात आले , या शिबिरादरम्यान तपासणी करणारे डॉक्टर ,डॉ. रवींद्र मुंडे, डॉ. शार्दुल जोशी, डॉ. प्रशांत सांगळे डॉ.नरेंद्र पायघन, डॉ. निशिकांत पाचेगावकर, डॉ. दत्ता ठोंबरे, डॉ. भागवत यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून बाबरी सेठ मुंडे, डॉ. भाऊसाहेब पुर्भे, अण्णामहाराज दुटाळ, डॉ. जगदीश टकले तसेच सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व
रोटरीयन तसेच अॅड. श्रीकांत मुंडे, उत्तरेश्वर तडसकर, अरुण मुंडे, श्याम थोटे, धनंजय मुंडे, मंगेश टकले, विकास मुंडे, गणेश कळसकर, सुधीर मुंडे डॉ. थोटे आंधळे आप्पा, नवनाथ मुंडे, विक्रम बडे ,बालाजी चाटे, अशोक मुंडे मुंडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.