बीड जिल्हा

बीड जिल्हाभरात होत असलेल्या आर्थिक जनगणनेस परळी वैजनाथ येथे प्रारंभ

परळी वैजनाथ: आठवडा विशेष टीम―
महाराष्ट्रभर गावागावांमध्ये आर्थिक जनगणना सुरू झाली आहे मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यात आर्थिक जनगणना एक जानेवारीपासून सुरू झाली आहे त्याच धर्तीवर संरक्षणाचे काम कॉमन सर्विस सेंटर सीएससी ई-गव्हर्नन्स ला देण्यात आले आहे प्रथमत: पेपरलेस मोबाईलवर गणना होणार आहे आर्थिक गणना नुसार फेरीवाले लघुउद्योग व्यवसाय यासह देशातील भौगोलिक स्थितीत सर्व व्यावसायिक, आस्थापने मोजली जाणार आहेत
या गणनेमार्फत व्यवसाय, स्थापना, मालकी त्यात गुंतलेले लोक इत्यादींच्याबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल या माध्यमातून प्राप्त केलेली माहिती सामाजिक आर्थिक विकासासाठी एक व्यापक योजना तयार करण्यास उपयुक्त ठरेल ,या आर्थिक जनगणनेत कृषिक्षेतत्रा व्यतिरिक्त आर्थिक गणनेमध्ये कुटुंबांमध्ये कार्यरत असणारे लहान उपक्रम वस्तू व सेवांच्या उत्पादन किंवा वितरणात गुंतलेली युनिटसह सर्व बाबींचा समावेश असणार आहे सातवी आर्थिक जनगणनेत सर्व प्रकारची सेवा उद्योग व्यवसाय प्रत्येक घराघरात जाऊन आणि व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षित गणका मार्फत केले जाणार आहे केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक जनगणना देशात केली जात आहे भारतातील सहावी आर्थिक जनगणना सन 2013 मध्ये झाली तर पहिली आर्थिक जनगणना 1777 मध्ये झाली त्याचबरोबर दुसरी गाना 1980 तिसरीत 190 चौथी 1998 पाचवी 2005 मध्ये झाली

त्याच माध्यमातून Csc Vle कॉमन सर्विस सेंटर मार्फत ही आर्थिक जनगणना महाराष्ट्र मध्ये व त्याच बरोबर आपल्या बीड जिल्ह्या मध्ये सुरू झाली आहे ,सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत केंद्रशासनाच्या सौजनणन्याने , केंद्रीय मंत्री श्री रविशंकर प्रसाद, CSC VLE, CEO दिनेश त्यागी सर यांच्या संकल्पनेतुन आणि मार्गदर्शनाखाली समीर पाटील सर,प्रशांत राजगुरू सर,DM रवींद्र धुमाळ, इझहर येहमद ,बाळासाहेब कदम,तेजस बोंडे, यांच्या मार्गदर्शनाने बीड जिल्ह्यात आर्थिक सर्वेक्षणाचे काम प्रगती पथावर सुरू आहे.याच माध्यमातून परळी वैजनाथ येथे येथील CSC VLE नितीन ढाकणे, सुरेश मुंडे,ऋषिकेश होळकर,दिपक गित्ते,संदीप आंधळे, अझहर खान, महेश मुंडे, गोविंद वणवे, सोमनाथ कांदे,आदींच्या माध्यमातून आर्थिक जनगणनेचे काम सुरू आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.