राज्य विधीमंडळातील प्रस्तावाच्या मंजूरीचे केले स्वागत
मुंबई दि. ०९:आठवडा विशेष टीम― आगामी राष्ट्रीय जनगणनेत इतर मागास प्रवर्गातील नागरिकांची स्वतंत्र नोंद करण्यात यावी या राज्य विधीमंडळातील प्रस्तावाच्या मंजूरीचे पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे, या जनगणनेमुळे ओबीसी वर्गाला न्याय मिळेल अशी भावना त्यांनी ट्विट द्वारे व्यक्त केली आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ओबीसी नागरिकांची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी आग्रही मागणी संसदेत केली होती, त्याला आता मूर्त स्वरूप येणार आहे. २०२१ मध्ये होणा-या राष्ट्रीय जनगणनेत इतर मागास प्रवर्गातील नागरिकांची स्वतंत्र नोंद करण्यात यावी असा प्रस्ताव राज्य विधीमंडळात एकमताने मंजूर झाला, यावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करतांना ‘ओबीसी जनगणना होणे हेच पाहिलं पाऊल! हे पाऊल ओबीसींना न्याय देण्यासाठीच्या भविष्याकडे नेईल.विधानसभेचा हा निर्णय ओबीसींना ताकद द्यावा, निर्णय केवळ राजकीय नाही हा विश्वास ओबीसी मध्ये दृढ करणे आवश्यक आहे ‘ असे म्हटले आहे.