परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणविशेष बातमी

परळीत येण्यापूर्वी धनंजय मुंडे गोपीनाथगड व पंडित अण्णांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक! ; परळीत अभूतपूर्व स्वागत

...न भूतो न भविष्यती! परळीच्या भूमीपुत्राचे अभूतपूर्व स्वागत!

शहरात दिवाळीचे वातावरण; संपूर्ण शहर कौतुकासाठी रस्त्यावर

परळी दि. १०:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ असलेल्या परळीत पोचले! परळीकरांनी आपल्या कर्तृत्ववान भूमीपुत्राचे न भूतो न भविष्यती असे अभूतपूर्व स्वागत केले. डोळे दिपवणारी रोषणाई, संपूर्ण शहरातील प्रत्येक घरावर केलेली विद्युत रोषणाई व जमलेल्या अलोट गर्दीने वाजत गाजत ना. मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

स्वागतासाठी संबंध परळी शहर अक्षरशः दिवाळी प्रमाणे सजले असून प्रत्येक परळीकर रस्त्यावर येऊन फुलांचा वर्षाव करीत स्वागत करताना दिसत होते. यावेळी खास सजवलेल्या रथातून ना मुंडे यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी केरळ वरून निमंत्रित केलेले वैशिष्ट्यपूर्ण वाद्यपथक, जबलपूर मध्यप्रदेश येथून खास निमंत्रित केलेले पंजाबी बँड, ढोल ताशा पथक, संबळ व हलगी पथक यासह विविध वाद्ये व आतिषबाजी असा दर्शनीय सोहळा परळीकरांनी आयोजित केला होता.

सोन्याच्या आभूषणाची, फळे,कपडे आणि भांडयांनी सजवल्या स्वागत कमान

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोंढा मैदान या मिरवणुकीदरम्यान एका चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवर अनेक स्थानिक महिलांनी आपली सोन्याची आभूषणे बांधून आपल्या लेकाचे आगळे वेगळे स्वागत केले. शहरातील बागवान व्यापाऱ्यांनी फळांची कमाल केली होती तर कपडे व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील नवीन कपड्यांनी कमानी सजवल्या होत्या एका भांडे व्यापाऱ्यांनी चक्क भांड्यांची क्रमांक केली ऊसाची कमानही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केल्याचे दिसून आले शहरात फक्त उत्साह उत्साह आणि उत्साह दिसून येत होता.

आगमन आणि जल्लोष

सायंकाळी ना. मुंडेंचे परळीत आगमन होताच परळीकरांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. ना. मुंडेंनी मिरवणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन शिवरायांना वंदन केले. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरही सुशोभीत करण्यात आला होता. तेथून उघड्या वाहनातून ना. मुंडेंची मिरवणूक निघाली, या वाहनात जिल्ह्यातील आमदार प्रकाशदादा सोळंके, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख व पदाधिकारी उपस्थित होते.

'अप्पा' व अण्णांच्या चरणी

परळीला येण्यापूर्वी ना. मुंडे यांनी गोपीनाथगड येथे जाऊन दिवंगत भाजप नेते तथा काका स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना ना. मुंडे भावूक झालेले पाहायला मिळाले. मी 'अप्पा व अण्णा' यांचा विचारांचा व संघर्षाचा वारसा चालवत आहे व पुढेही चालवत राहील असेही ना. मुंडेंनी यावेळी म्हटले आहे. यानंतर ना. मुंडे यांनी वडील स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी भावूक झालेल्या मुलाने आपल्या वडिलांच्या आठवणी व वाट्याला आलेला संघर्ष आठवत डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या पाहायला मिळाल्या. 'अण्णा तुमचा धनु मंत्री होऊन परळीत आलेला पाहायला तुम्ही हवे होतात!' असे म्हणत ना. मुंडे भावूक झाले.

बीड - परळी रस्त्यावर प्रत्येक गावात अभूतपूर्व स्वागत

बीड पासून परळी पर्यंत प्रत्येक गावात ना. मुंडे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत केले. कुणी फुल - हार, पुष्पगुच्छ तर कुणी क्रेन व जेसीबी घेऊन फुले उधळत होती. हा उत्साह व हे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. बीड ते परळी तसे एक ते दीड तासाचे अंतर परंतु जागोजाग झालेल्या स्वागत सत्कारांमुळे मुंडेंच्या ताफ्याला बीड येथून परळीला पोहचायला तब्बल चार तास लागले!

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.