बीड जिल्हाब्रेकिंग न्युजरस्ते अपघातशिरूर तालुका

बीड: भरधाव कारच्या धडकेत खोकरमोहा येथील श्रीराम सानप यांचा मृत्यू

बीड:आठवडा विशेष टीम―भरधाव कार ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होऊन ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे.अपघाताची ही घटना बीड-अहमदनगर महामार्गावरील वंजारवाडी फाटा परिसरात शनिवारी (दि.११ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार,श्रीराम विठ्ठल सानप (२८, रा.खोकरमोहा ता.शिरूर कासार) असे मयताचे नाव आहे तर दुचाकीवरील महेश विष्णू मिसाळ (रा.खोकरमोहा) हे गंभीर जखमी झाले आहेत.शनिवारी सायंकाळी श्रीराम आणि महेश हे दोघे दुचाकीवरून (MH23 AX 4738) बीड वरून खोकरमोहाकडे निघाले होते.वंजारवाडी शिवारात त्यांना भरधाव कार ने (MH23 N 5170) जोराची धडक दिली.यात दोघेही गंभीर जखमी झाले.श्रीराम यांचा मृत्यू झाला तर महेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी बळीराम विठ्ठल सानप यांच्या फिर्यादीवरून कार चालका विरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.