पाटोदा तालुकाबीड जिल्हा

खासदार, आमदारांनी राजकीय ताकद वापरुन शेतकऱ्यांना रब्बीचे पिक विमा कवच मिळवुन द्यावे―भाई विष्णुपंत घोलप

पाटोदा:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हयात सन २०१९ - २० सालातील शेतकऱ्यांकडून रब्बीचा प्रधानमंत्री पिक विमा भरवुन घेतला नाही. निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी केंव्हा ही शिकार होऊ शकतो त्या साठी दि. ३१डिसेंबर २०१९ ऐवजी दि. ३१ जानेवारी २०२० ची मुदत रब्बीचा पिक विमा भरण्यासाठी देण्यात यावी या साठी खासदार आणि आमदार यांनी आपली राजकीय ताकद वापरुन शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा कवच मिळवुन द्यावे असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे राज्य आणि केंद्र सरकार मधील लोक प्रतिनिधींना कळविले आहे. मागील वर्षाचा दुष्काळ आणि या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी अर्थिक दृष्टया हतबल झालेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश चांगला असताना शेतकरी पिक विमा संरक्षीत कवचापासुन अलिप्त राहत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाला आज कोणते ही सरंक्षण नसुन तो आज नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला आर्थिक नुकसान सहन होणार नाही. जरी ही काही विमा कंपन्या निविदा भरत नसतील तर स्वतःभारतीय कृषी विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून प्रधानमंत्री पिक विमा संरक्षीत भरणा भरुन घ्यावा त्या साठी राज्य आणि केंद्र सरकार मधील लोकप्रतिनिधी यांनी आपली राजकीय ताकद वापरुन शेतकऱ्यांना २०१९ - २०२० चा रब्बी पिक विमा कवच मिळून द्यावे, असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे खासदार आणि आमदार यांना कळविले आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.