बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यसामाजिक

ना. पंकजाताई मुंडे यांनी केले पद्मश्री पुरस्कार प्राप्त वामन केंद्रे, सय्यद शब्बीर यांचे अभिनंदन

मुस्लिम समाजातील गो - रक्षकाचा केला बहुमान

बीड दि. २६: बीड जिल्हयाचे सुपूत्र प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे आणि गोरक्षक सय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या सन्मानासाठी त्यांच्या नावांची शिफारस ना. पंकजाताई मुंडे यांनी केली होती.

नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे हे दरडवाडी ता. केज येथील रहिवासी असून नाट्य क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे तर गोरक्षक आणि समाजसेवक सय्यद शब्बीर हे शिरूर कासारचे रहिवासी आहेत. शिरूरपासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीवर राहणारे सय्यद शब्बीर नावाची मुस्लिम व्यक्ती गोशाळा चालवते. कसलेही अनुदान नाही, फार मोठी कोणाची मदत नाही तरी देखील सय्यद शब्बीर हे गेल्या वीस वर्षांपासून शेकडो गाईंचे पालन पोषण आणि सेवा करतात. ६५ वर्षीय शब्बीर यांची गोपालन ही वडिलोपार्जित परंपरा आहे. त्यांच्याकडे ८६ गाई असून कुटुंबातील १० व्यक्ती सेवेत कार्यरत आहेत.विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंबाने या कामात वाहून घेतलेले आहे. अशा या निस्वार्थाने गो सेवा करणाऱ्या शब्बीर यांना पद्मश्री पुरस्काराची शिफारस पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केली होती. पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाण्या येण्याची व्यवस्था देखील ना. पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.