अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

राजमाता जिजाऊ व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करा―प्रा.आर.ए.चौधरी धर्मापुरीकर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राजमाता जिजाऊ व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून या महामानवांचे विचार तरूण पिढीने आत्मसात करावेत असे आवाहन प्रा.आर.ए.चौधरी (धर्मापुरीकर) यांनी केले ते धर्मापुरी येथील कै.शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलत होते.

धर्मापुरी येथील कै.शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सुरेश चाटे तर प्रमुख व्याख्याते म्हणुन वाणिज्य विभागप्रमुख प्रा.आर.ए.चौधरी (धर्मापुरीकर) यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी राजमाता जिजाऊ व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. अध्यक्षीय समारोप प्रा.सुरेश चाटे यांनी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.संजीवनी मुंडे यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.अविनाश मुंडे यांनी मानले.या कार्यक्रमास डॉ.जांगीटवार,डॉ.नरवाडे, प्रा.संग्राम कासारे,प्रा.राहुल गायकवाड,प्रा.राजकुमार मोमले,कार्यालयीन कर्मचारी बळी पेंटुळे,शिक्षकेत्तर कर्मचारी शेख कासिम यांच्या सहीत अनेकांची उपस्थिती होती.