बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

बीड येथील NRC CAA NPR या आंदोलनास उपस्थित रहावे―ज्ञानेश्वर कवटेकर व बालाजी जगतकर

बीड:आठवडा विशेष टीम―
देशातील केंद्र सरकारने जो नवीन कायदा केला आहे तो अनेक समूहावर अन्याय करणारा आहे. NRC आणि CAA या दोन कायद्या विरोधात आगडोंब उडाला आहे. या कायद्याला वंचित बहुजन आघाडीच्या सुरूवाती पासून विरोध आहे वेळोवेळी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी या संबंधी भुमिका जाहीर केली असून वंचित बहुजन आघाडीने त्याविरोधात दि.26 डिसेंबर 2019 रोजी दादर टीटी मुंबई येथे धरणे आंदोलन केले होते.
हा कायदा फक्त मुस्लिम समुहाच्या विरोधात आहेत पण हिंदू समाजातील 40 % जनतेवर परिणाम होणार आहेत, हे दोन्ही कायदे देशाला मारक आहेत .म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात वेगवेगळे आंदोलन केली जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून बीड येथील वंचित बहुजन आघाडी च्या एका बैठकीमध्ये सर्वानुमते दि.20/1/2020 वार सोमवार रोजी बीड जिल्हाधीकारी कार्यालयावर भव्य निदर्शने 11ते 3 या वेळेत करण्यात येणार आहे तरी बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच संविधान प्रेमी जनतेने या आंदोलनास हाजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी बीड वतिने करण्यात येत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर कवटेकर व बालाजी जगतकर यांनी पञकातून कळवले आहे.