मुंबई:आठवडा विशेष टीम― लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वरळी येथील कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येत असून कार्यालयाच्या उदघाटनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हे उदघाटन २६ जानेवारी ऐवजी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी माहिती पंकजाताई मुंडे यांनी दिली.
वरळीच्या ‘शुभदा’ बिल्डींग मधील कार्यालय परत सुरू करण्याची तारीख २६ जानेवारी ठरवली होती पण सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने ही तारीख पुढे ढकलली आहे. आता उद्घाटन ५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता ठरवले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे म्हटले आहे.