क्राईमपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

सरपंचपरिषदेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नागरगोजे मारहाण प्रकरणी ६ जणांवर FIR दाखल

बीड दि.२३:आठवडा विशेष टीम― बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटोदा तालुक्यातील रोहतवादी येथील सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.यामध्ये अंगद खंडू काळूसे,महादेव भिमराव खाडे,अजित अश्रुबा वणवे,अजित हनुमंत पवार,राम शशिकांत हरी,पवन अनिल जायभाये यांचा समावेश आहे. या सर्वांवर कलम १४३ ,१४७ ,१४९ ,३२४ ,५०६ ,५०४ नुसार गुन्हा नोंद झाला आहे.दि.२२ जानेवारी रोजी दुपारी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीचे भाजपचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कॉल करून बोलवून घेऊन बेदम मारहाण केली होती. भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.तसेच फेसबुकवर पोस्ट टाकून पांडुरंग नागरगोजे यांना धमकीही देण्यात आली. 'धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही. लायकीनुसार बोलं नाहीतर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सरपंच परीषदेचे जिल्हाध्यक्ष तसेच भाजपा पाटोदा तालुका सरचिटणीस पांडुरंग नागरगोजे यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पंकजा मुंडेंनी ट्वीट करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे."बीड जिल्यातील शांतता आणि सुख कायम राहावं, असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो, अशी भावना होती पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही. माझ्या कार्यकर्त्याला मारहाण दबाव दहशत हेच ध्येय दिसतंय. त्यामुळे हे खपवून घेतलं जाणार नाही." अशा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे. तसेच, "सत्ता नाही तरी पुण्याई आहे आणि हिंमत ही आहे. सामाजिक न्याय करा अन्याय इथं चालत नाही", असा टोलाही पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.