ब्रेकिंग न्युज

परळी पिंपळा अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग 548 ब च्या कामाच्या चौकशी साठी विशेष दक्षता पथकाची स्थापना―वसंतराव मुंडे

परळी:आठवडा विशेष टीम―गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग परळी वैजनाथ पिंपळा अंबाजोगाई रस्त्याचे काम न झाल्यामुळे सर्व जनतेला येण्याचा व जाण्याचा खूप मोठा त्रास झाला रस्ता दोन्ही बाजूने खोदून टाकला होता मुदतीच्या आत काम न झाल्यामुळे शासनाकडे काँग्रेसचे नेते चेअरमन वसंतराव मुंडे श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी नेहमी शासनाकडे निवेदन देऊन कामाची गुणवत्ता व भ्रष्टाचारासंदर्भात गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे टेंडर रद्द झाले व नव्याने टेंडर ओपन झाले त्यामध्ये औरंगाबादचे कंपनी AGC R SBIPL JV सुटले आहे ज्या अधिकाऱ्यांनी बोगस कामास व कामाला मुदतवाढ देण्यात आली त्यात कनिष्ठ अभियंता उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता जबाबदार आहेत त्यांच्यावर तात्काळ चौकशी पथक दिनांक 2/1/2020ला स्थापन झाले असून चौकशी करून निलंबित करण्यासंदर्भात व यांच्यावर एफ आय आर करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी शासनाकडे मागणी केली असून त्यांची नोंद घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत अनेक अपघात झाली पावसामध्ये गाड्या स्लिप झाल्या येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला रस्ता खराब असल्यामुळे पाठीच्या कण्याचे आजार झाले तसेच धुळीमुळे दम्यासारखे रोग झाले कारण दोन्ही बाजूने रस्ता खोदून टाकल्यामुळे व 35 कोटीचे बोगस बिले दिल्यामुळे अंदाजपत्रकाचे नियम च्या आधीन एकही काम न झाल्यामुळे जी झाली ती निकृष्ट दर्जाची आहेत सर्व नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत त्यासंदर्भात तात्काळ शासनाने काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी दिनांक 26/ 12 /2019 ला तक्रार करून दिनांक 2/1/ 2020 ला दक्षता पथक नेमण्याचे आदेश देण्यात आले तात्काळ चौकशी करून निलंबित करण्याची मागणी काँग्रेसचे नेते चेअरमन वसंतराव मुंडे रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी मागणी केली आहे अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली.