ब्रेकिंग न्युज

अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; बीडमध्ये कार्यकर्त्यांना धरपकड, संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद

बीड:आठवडा विशेष टीम― देशामध्ये अराजकता माजवण्याचे काम केंद्रशासित भाजप सरकार करत असून देशामध्ये हुकूमशाही पद्धतीने मोदी आणि शहा निर्णय घेत आहेत. हे निर्णय संविधान विरोधी आहेत. एन,आर,सी. सी,ए,ए. एन,पी,आर हा संविधान विरोधी कायदा व धोरण लागू केले आहे. या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आज दि. 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला बीड जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमी जनतेने 100% बंदमध्ये सहभागी होऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत कुठलीही अनुचित घटना न घडता जिल्ह्यात बंद 100% यशस्वी झाला आहे. बीड शहरात काल सायंकाळपासून काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केल्यामुळे थोडावेळ तणावाचे वातावरण पसरले होते. हा अपवाद वगळता बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राप्त माहितीनुसार बीड शहरासह 11 तालुक्यामध्ये जवळपास 75 टक्के बंद यशस्वी झाला आहे.
नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार कागदोपत्री पुराव्याची मागणी करत आहेत. हिंदू, मुस्लिम, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, पोटासाठी भटकंती करणारे,स्थलांतरित ४०% लोकांकडे कागदपत्रे नाहीत. तसेच त्यांच्याकडून भारतीय संविधानाने दिलेले नागरिकत्व व समान अधिकार काढून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे.हे देशासाठी मारक आहे. या निर्णयामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज दि 24 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या हाकेला बीडसह जिल्ह्यातील 11 ही तालुक्यातून सर्वसामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनी,शैक्षणिक संस्था आदींनी सहभागी होऊन एन,आर,सी. सी,ए,ए. एन,पी,आर. कायद्या विरोधात उभे राहुन वंचित बहुजन आघाडी च्या निर्णयाचे स्वागत केले.
बीड शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी चे राज्य समन्वयक भिमराव दळे यांच्यासह बीड विधानसभेचे उमेदवार अशोक हिंगे, केज विधानसभेचे उमेदवार वैभव स्वामी, गेवराई विधानसभेचे उमेदवार विष्णू देवकते यांच्यासह डॉ. नितीन सोनवणे, किशोर कागदे,बबन वडमारे, संतोष जोगदंड, ज्ञानेश्वर कवठेकर, खंडू नाना जाधव, शेक युनुस,अजय सरवदे,अजय साबळे,किरण वाघमारे,सुमित उजगरे,विश्वजीत डोंगरे,लखन जोगदंड,पुष्पाताई तुरुकमारे, उमेश तुळवे, बालाजी जगतकर आदीं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शांततेत रॅली काढून बंदचे आवाहन केले. यास बीडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा जवळपास 80 टक्के बंद होत्या. शाळेने शंभर टक्के बंदमध्ये सहभाग घेऊन केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. शहरातील प्रमुख रस्ते देखील बंदमुळे शांत होते.