ब्रेकिंग न्युज

बीड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मजबूत ठेवण्याची जिम्मेदारी राजेंद्र मस्के निभावतील―खा.प्रीतमताई मुंडे

बीड.दि.२४:आठवडा विशेष टीम―बीड जिल्हा हा कायम भारतीय जनता पार्टी साठी महत्त्वाचा राहिला आहे स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्ष व कार्य कर्तृत्वाने कार्यकर्ते भाजपासाठी बालेकिल्ला ठरला आहे राज्यात आणि जिल्ह्यात राजकीय परिस्थिती प्रतिकूल असल्याने वेळोवेळी लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे आपल्याला संघर्षाची जुनीच परंपरा आहे जनतेच्या न्याय हक्कासाठी हा लढा कायम ठेवावा लागेल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता एकजुटीने शासनाच्या विरोधात आवाज उठवतील या संघर्षाचे नेतृत्व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन एकजुटीने नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे प्रामाणिकपणे पार पाडतील असा विश्वास आम्हाला आहे भारतीय जनता पक्षाचे कार्य आणि विचार सर्वसामान्य जनांपर्यंत पोचवून पक्ष मजबूती साठी जिल्हाध्यक्ष या नात्याने राजेंद्र मस्के यांचा राजकारण व समाजकारणातील अनुभव कामी पडेल स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी निर्माण केलेला हा बालेकिल्ला मजबूत ठेवण्याची जबाबदारी राजेंद्र मस्के बिनदिक्कतपणे पार पडतील असा विश्वास खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे आज बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी माजी मंत्री सुभाष देशमुख, खासदार प्रीतम ताई मुंडे, मराठवाडा प्रांत प्रमुख भाऊराव देशमुख, आमदार सुरेश अण्णा धस, रमेशराव आडसकर, रमेश राव पोकळे, माजी आमदार सर्वश्री केशव दादा आंधळे, भीमराव धोंडे, आदिनाथ राव नवले पाटील, राजाभाऊ मुंडे, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, जि प सदस्य योगिनी थोरात, वैजनाथ मिसाळ, राणा डोईफोडे, अशोक लोढा, विजयकांत मुंडे, भारत काळे, सर्व तालुक्यांचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री मुंडे, सुभाष धस, बीड शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, विजयकुमार पालसिंगणकर, बीड शहर व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.