राजकारणलेखविशेष बातमी

भाजपासाठी 12 वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करणारे नेते धनराज गुट्टे यांना भाजप ओबीसी मोर्चा किंवा भटके विमुक्त आघाडी राज्याध्यक्ष पदावर नियुक्त करून न्याय द्यावा

भारतीय जनता पक्षासाठी व वंजारी समाजासाठी गेल्या 12 वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करणारे युवक नेते श्री धनराज विक्रम गुट्टे याना पक्षाने व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र किंवा भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्त करून न्याय द्यावा

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― लातूर जिल्ह्यतील अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी गावचे सुपुत्र उच्च शिक्षित श्री धनराज विक्रम गुट्टे यांचा जन्म 25 एप्रिल 1989 रोजी झाला आहे . परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठातून त्यांनी पदवी चे शिक्षण पूर्ण केले आहे . विद्यार्थी दशेपासून च ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून आंदोलन व चळवळी मध्ये सक्रिय होते . तत्कालीन ABVP पदाधिकारी श्री प्रवीणजी घुगे, श्री सुधाकरजी भोयर,श्री शरदजी चव्हाण,श्रीमती सुरेखाजी किनगावकर यांच्या संपर्कात येऊन परभणी विद्यापीठ ते अनेक विद्यार्थी यांचे प्रश्नावर राज्यस्तरीय आंदोलने त्यांनी केलेली आहेत व करत आहेत . भाषेवर प्रभुत्व, वक्तृत्व कला, संघटन कौशल्य, विनम्र,आक्रमक,अभ्यासू,पूर्णवेळ प्रवास करण्याची क्षमता असणारा,राज्याच्या राजकारणाचा अभ्यास असणारा,धाडसी,संपूर्ण राज्यभरात कार्यकर्ते नेटवर्क असणारा आजच्या पिढीतील राजकीय वारसा नसलेला हा एकमेव निर्व्यसनी तरुण आहे . भाजपचे राष्ट्रीय नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा सहवास व मार्गदर्शन लाभलेला कार्यकर्ता म्हणून आज राज्यभरात श्री धनराज गुट्टे याना ओळखतात.चांदया पासून बांदयापर्यंत संपर्क असणारा मेहनती कार्यकर्ता म्हणून ही त्यांना ओळखतात. भाजपच्या नेत्या माजी मंत्री श्रीमती पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व लोकप्रिय खासदार डॉ प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून धनराज भाऊ गुट्टे हे राज्यभरात सुपरिचित आहेत. ज्यावेळी खरा लढाईचा काळ असतो अश्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्यातील मोठं मोठ्या मंत्री आमदार खासदार याना शिंगावर घेण्याचं काम आजही धनराज गुट्टे करत असतात. राज्यभरात कुठेही कसलाही अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वात पुढे असतात ते धनराज गुट्टे च….!! आज पर्यंत विविध सामाजिक आंदोलनात भाजप च्या आंदोलनात सामाजिक आंदोलनात श्री धनराज गुट्टे यांच्यावर महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये 41 गुन्हे दाखल आहेत . जामीन, अटक,सुटका,याच्याशी त्यांचे सामाजिक आंदोलनामुळे जवळचे नाते आहे.त्यांच्या सर्व आंदोलनाचे आज महाराष्ट्र राज्यात अनेकजण साक्षिदार आहेत . विद्यार्थी दशेपासून च ABVP व भाजप शी संबंध आला असल्यामुळे ते राजकारणात आल्या पासून भाजप मध्येच आहेत व एकनिष्ठ आहेत व निस्वार्थ पणे काम करत आहेत. आज पर्यंत भाजप विद्यार्थी आघाडी अहमदपूर तालुका अध्यक्ष, लातूर जिल्हा अध्यक्ष, भाजप विद्यार्थी आघाडी प्रदेश सरचिटणीस,भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य,भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, भाजप व्यापार आघाडी प्रदेश चिटणीस,भाजप ओबीसी मोर्चा चिटणीस, या पदावर गेल्या 12 वर्षांपासून जोरदार काम करत आहेत . सध्या त्यांच्यावर भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे.तसेच गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ही ते जीव धोक्यात घालून जबाबदारी सांभाळत आहेत . राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे जोरदार नेटवर्क आहे. मुंबई च्या राम भाऊ म्हाळगी प्रबोधनी येथून त्यांचे सतत तीन वर्षे प्रगत प्रशिक्षण कार्यकर्ता वर्ग पूर्ण झालेला आहे . प्रशासनाचा अभ्यास,प्रशासनावर जोरदार पकड आहे . ग्रामपंचायत पासून मंत्रालयाचा अभ्यास आहे .रस्त्यावर उतरणारा व वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचे देशभरात जोरदार काम चालू आहे . तरी माजी मंत्री पंकजाताई मुंडे,विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील,प्रदेश अध्यक्ष भाजप महाराष्ट्र,महाराष्ट्र संघटन मंत्री श्री विजयराव पुराणिक साहेब, श्रीआमदार सुजितसिंह ठाकूर,खासदार पुनमताई महाजन,खासदार डॉ प्रीतमताई मुंडे,खासदार सुधाकरजी शृंगारे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,डॉ भागवतजी कराड साहेब,माजी आमदार गोविंदराव केंद्रे साहेब ,श्री प्रवीण दादा घुगे साहेब,आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,आमदार अभिमन्यूजी पवार,माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब,प्रदेश प्रवक्ते श्री गणेशजी हाके श्री नागनाथजी निडवडे, माजी आमदार सुधाकरजी भालेराव,लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुलजी केंद्रे,श्री रामप्रभुजी मुंढे ,श्री अभयजींचाटे,श्री रामराव केंद्रे सर,श्री श्रीनिवासजी मुंढे,श्री त्रिंबकराव गुट्टे,श्री बाबरावजी बांगर,श्री विजयराव चौधरी,श्री अरुनजी मुंढे,श्री मारोतराव वणवे , मराठवाडा संघटन मंत्री मा श्री भाऊराव देशमुख साहेब ,श्री सतीश दादा नागरे, श्री अशोक भाऊ मुंढे,श्री रमेश भाऊ पोकळे,श्री राजेंद्रजी म्हस्के,श्री सर्जेराव तात्या तांदळे या सर्व मान्यवरांनी श्री धनराज विक्रम गुट्टे यांच्या सारख्या भटक्या विमुक्त समाजातील राजकीय वारसा नसलेल्या गरीब घरातील निस्वार्थी मेहनती धाडसी कार्यकर्त्याची भाजप ओबीसी मोर्चा किंवा भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी व त्यांना न्याय द्यावा ही विनंती. कोणताही राजकीय वारसा नसताना राजभरात गेल्या 12 वर्षांपासून काम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्याला पंकजाताई यांनी नियुक्ती देऊन न्याय द्यावा.

Back to top button