पूणे जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

नगर रस्त्यावरील तीन उड्डाणपुलांचा/ ग्रेड सेपरेटर भूमिपूजन समारंभ 15 मार्च पूर्वी ; प्रकल्प डिझाइन आणि आराखड्याला मान्यता

माजी आमदार जगदीश मुळीक आणि नगरसेवक योगेश मुळीक यांची माहिती

पुणे:आठवडा विशेष टीम―पुणे नगर रस्त्यावरील कल्याणी नगर, खराडी, विश्रांतवाडी या तीन ठिकाणच्या उड्डाणपुलाचा/ ग्रेडसेपरेटर या प्रकल्प आराखडा तयार झाला असून तो एस्टीमट समिती कडे पाठविण्यात आला आहे. 15 मार्च पूर्वी सर्व मान्यता घेऊन तिन्ही प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ करणार असल्याची माहिती माजी आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक यांनी आज दिली.

महापालिकेचे प्रकल्प प्रमुख श्रीनिवास बोनाला यांच्या बरोबर आज झालेल्या बैठकीत प्रकल्प आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली. यावेळी नगरसेवक अनिल टिंगरे, शीतल सावंत, चंद्रकांत टिंगरे उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

गोल्फ चौक उड्डाणपुलाचे काम याआधीच सुरू झाले आहे. या चारही प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. संपूर्ण पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून प्रकल्प आराखडा तयार करण्यात आले आहेत.
पार्श्वभूमी
१. केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सन २०१८ मध्ये पुणे शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ केले होते.
२. त्या सर्वेक्षणात पुणे-अहमदनगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली होती.
३. सन २०१८-१९ मध्ये भाजपचे वडगावशेरीतील नगरसेवक योगेश मुळीक यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली.
४. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी योगेश मुळीक यांनी २०१९-२० साठीचे पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले.
५. या अंदाजपत्रकासाठी तयारी करताना नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पुणे-नगर रस्ता हे एक एकक मानून ‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार करण्यात आला.
६. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बससं‘या, ठिकठिकाणी उड्डाण पूल/ग‘ेडसेपरेटर/भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे निश्‍चित करण्यात आले.
७. ‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखड्या’नुसार महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे
‘ गोल्फ चौक येथे उड्डाणपुलाचे काम सुरु झाले आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘ खराडी येथे उड्डाणपूल किंवा ग‘ेडसेपरेटर प्रकल्प आराखडा अंतिम मान्यता (तरतूद १५ कोटी रुपये)
‘ कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपूलाचे विस्तारीकरण प्रकल्प आराखड्याला मान्यता झाली.(तरतूद १५ कोटी रुपये)
‘ येरवडा शास्त्रीनगर येथे उड्डाण पूल प्रकल्प आराखडा मान्यता झाली.(तरतूद २० कोटी रुपये)
‘ विश्रांतवाडी येथे केंद्र शासन व पुणे मनपाच्या संय ुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाण पूल प्रकल्प आराखडा व काम प्रस्तावित आहे. (तरतूद २० कोटी रुपये)
८. अशाप्रकारे पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल किंवा ग‘ेडसेपरेटरसाठी अंदाजपत्रकात ९० कोटी रुपयांची भरीव तरतूद करुन घेतली
९. मी स्वतः आणि वडगावशेरी मतदारसंघातील भाजप व आरपीआयचे सर्व नगरसेवक या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आयुक्त व संबंधित खात्यांशी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत.
१०. सर्व नियोजित प्रकल्प स्थळांना अधिकार्‍यांसमवेत वारंवार भेटी देऊन वाहतूक प्रश्‍नांचा अभ्यास केला आहे.
११. अंदाजपत्रकातील निधीसाठी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत पाठपुरावा सुरू आहे.