अंबाजोगाई पिपल्स बँकेला शेतकरी व व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद―राजकिशोर मोदी

सिरसाळाकरांची एटीएमची मागणी पिपल्स बँकेकडून पूर्ण-अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके

अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सिरसाळा शाखेचे वास्तु नुतनीकरण व एटीएम उद्घाटन सोहळा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― 19 वर्षांपूर्वी सिरसाळा येथे पिपल्स बँकेने शाखा सुरु केली ग्राहकांना अद्यावत सुविधा व तत्पर सेवा देवून ठेवीदार, कर्जदार यांचा विश्‍वास बँकेने मिळवला.शेतकरी व व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.बँकिंग क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली असताना अंबाजोगाई पिपल्स बँक मात्र भरीव प्रगती करीत आहे.बँकेचे शाखाधिकारी निलेश दहिवाळ व त्यांचे सर्व कर्मचारी ग्राहकांना दर्जेदार सेवा देत आहेत.बँकेने मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात विस्तार केला आहे. सिरसाळा येथील नागरिकांनी 22 कोटींच्या ठेवी पिपल्स बँकेकडे विश्‍वासाने ठेवल्या आहेत.या पुढेही ग्राहकाने बँकेत बचत करावी.कर्जदाराने नियमित परतफेड करावी असे आवाहन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी केले.

अंबाजोगाई पिपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या सिरसाळा शाखेचे वास्तु नुतनीकरण व एटीएम उद्घाटन सोहळा रविवार, दि.26 जानेवारी सिरसाळा (ता.परळी) येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके तर व्यासपीठावर बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तसेच प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड.अजय बुरांडे,पं.स.सदस्य जानीमियाँ कुरेशी,जि.प.सदस्य धम्मानंद किरवले,सरपंच विश्‍वनाथ किरवले,ज्येष्ठ नेते रामदादा किरवले,विनोदकुमार ललावाणी,संतोष पांडे, उपसरपंच पठाण,शेख नदिम भाई,शेख निहालभाई,माजी सभापती मोहनराव सोळंके, आक्रमखाँ पठाण,बाळासाहेब किरवले,सय्युम पठाण,मधुकर किरवले,फेरोज पठाण,नरहरी अण्णा निर्मळ,ग्रामविकास अधिकारी ए.सी.शेख, भाऊसाहेब घोडके,देवराव काळे,सतिशराव काळे, बाबासाहेब काळे, बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंके, संचालक प्रा.वसंतराव चव्हाण, दत्तात्रय दमकोंडवार,अरुण काळे,पुरुषोत्तम चोकडा,शेख महेमुद शेख दादामियाँ,लक्ष्मण दासुद,सुरेेश मोदी,प्रा.रोहिणी पाठक,सचिन बेंबडे,नगरसेवक मनोज लखेरा,महादेव आदमाने, असिफोद्दीन खतीब,सुनिल व्यवहारे,धम्मपाल सरवदे, इस्माईल गवळी,अनिस अन्सारी, शेख रहीमभाई,असदभाई, अशोक मोदी,शमिमोद्दीन खतीब,बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड,शाखाधिकारी निलेश दहिवाळ आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी योगेश्‍वरी देवी प्रतिमापुजन व दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी उत्कृष्ट ग्राहक म्हणून चंद्रकांत कराड, सुदामअप्पा देशमुख,अशोकराव मोरे,रामकिसन गडदे,शरद कदम,अर्चना राडकर,नंदकिशोर परदेशी यांचा तसेच ग्रामसेवक ए.सी.शेख सिरसाळा शाखेचे फर्निचर तयार करुन देणारे राजु जांगिड यांचा बँकेच्या वतीने तर सिरसाळा येथील व्यापारी संघाच्या वतीने बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, संचालक अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी कॉ.अजय बुरांडे यांनी पिपल्स बँकेच्या तत्पर सेवेचे कौतुक करुन सिरसाळाकरांची एटीएमची प्रतिक्षा दुर केल्याबद्दल बँकेचे आभार मानले व बँकेस सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.ज्येष्ठ नेते रामदादा किरवले यांनी पिपल्स बँक ही सिरसाळा करांची हक्काची बँक आहे. त्यामुळे नागरिकांनी या बँकेत आपले खाते काढावे व कर्जदारांनी नियमित कर्जफेड करावी असे आवाहन किरवले यांनी केले.याप्रसंगी उत्कृष्ट ग्राहक रामकिसन गडदे यांनी पिपल्स बँके विषयीचा चांगला अनुभव उपस्थितांसमोर ठेवला. अडचणींच्या काळात बँकेने केलेली मदत व कर्मचारी वर्गाने दिलेला चांगला प्रतिसाद व तत्पर सेवा याविषयी माहिती दिली.अध्यक्षीय समारोप करताना अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी सिरसाळा येथील शाखेतील सभासद ठेवीदार, कर्जदार,खातेदार यांचे आभार मानले.385 कोटींहून अधिकच्या ठेवी असणार्‍या बँकेेकडे ग्राहकांचा ओढा वाढतोय असे सांगुन येथील कर्जदार नियमित परतफेड करतात सिरसाळा शाखेचा वटवृक्ष होतोय एटीएमची मागणी असल्याने बँकेच्या वतीने आज ही सेवा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित पंचक्रोशितील विविध गावचे सरपंच,विविध सोसायट्यांचे चेअरमन,बँकेेचे सभासद ठेवीदार,कर्जदार,खातेदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याबद्दल अ‍ॅड.सोळंके यांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी करुन उपस्थितांचे आभार बँकेच्या संचालिका प्रा.रोहिणी पाठक यांनी मानले.या कार्यक्रमास योगेश्‍वरी मल्टीस्टेटचे चेअरमन रिकबचंद सोळंकी,प्रा.अजय पाठक,हरिभाऊ बडे,यांचेसह सिरसाळा व पंचक्रोशितील नागरिक,पत्रकार,बँकेचे ठेवीदार, ग्राहक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.