अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कै. शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी (ता.परळी) येथे ए.मा.कुलकर्णी यांना अभिवादन करण्यात आले.ए.मा.कुलकर्णी यांचे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोठे योगदान असून ते इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक म्हणुन ही ओळखले जात त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची ओळख नव्या पिढीला व्हावी व त्यांचा आदर्श समाजासमोर कायम रहावा या विधायक भूमिकेतुन ए.मा. कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृती जागविण्यात आल्या.कै. शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी,ता.परळी येथे ए.मा.कुलकर्णी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन अॅड.प्रकाश मोती,सुरेश म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमाचे आयोजन कै.शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा.आर.ए.चौधरी यांनी केले होते.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती होते.सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रा.अविनाश मुठे यांनी मानले.
0