ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यशैक्षणिकहेल्थ

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सातारा जिल्ह्यातील युवकांना "युवा सन्मान २०२०" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

सातारा:आठवडा विशेष टीम―राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील कला-क्रीडा, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक - राजकीय, पत्रकारिता वैदकीय क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने युवा सन्मान २०२० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वैद्यकिय क्षेत्रात डॉ सहर्ष घोलप पाटील यांचा सम्मान करण्यात आला तेव्हा मान्यवरांचे स्वागत युवा नेते
गणेश सावंत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
सदर पुरस्कार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मा सनी मानकर साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आला. त्यावेळी अध्यक्ष, मान्यवर, सत्कार मूर्तींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संयोजक योगीराज रणनवरे इनामदार यांनी आभार मानले.त्यावेळी युनिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुज्जम्मील शेख, विनोद फडतरे, अमीन आगा, अजय शिंदे, संदीप काटकर, विनोद खाडे, अमर माने, सौ.अनिता धनवडे, विक्रांत राऊत, नरेंद्र सावंत, अजित पाटेकर, अतुल पवार, महेश पवार इकबाल शेख व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.