अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

स्नेहसंमेलनातून व्यक्तीमत्व विकास―गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोणशिकर

ज्ञानमंदिर बालसंस्कार केंद्राचे स्नेहसंमेलन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त आहे.स्नेह संमेलनातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी घडले जातात.त्यांना विविध क्षेत्रात आवड निर्माण होते सुजाण नागरिक तयार होतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध कलागुण जोपासावेत असे प्रतिपादन अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोणशिकर यांनी केले.

शहरातील श्री तांबवेश्वर सेवाभावी संस्था संचलित ज्ञानमंदिर बालसंस्कार केंद्राचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती सौ.विजयमाला जगताप या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणुन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोणशिकर, प्रा.प्रशांत जगताप,डॉ.राहुल डाके,रमेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात ज्ञानमंदिर बालसंस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण दर्शन सादर केले.गाणे, एकांकिका,मुकअभिनय आदी कला कौशल्य दाखविले. कार्यक्रमास पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अविनाश तोंडे,सचिव वर्षाताई तोंडे यांच्यासह रेवती शेटे,अर्चना पवार,विद्या चव्हाण,अर्चना नखाते,पुजा माळवदे,अभिजीत पवार,गोविंद चव्हाण,अजित माळवदे,योगेश कडबाने यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली चव्हाण यांनी करून उपस्थितांचे आभार संस्थेच्या सचिव वर्षाताई तोंडे यांनी मानले.