अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीसामाजिक

विद्रोही युवा मंचचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण,उपोषणाचा पाचवा दिवस ; प्रशासनाची डोळेझाक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
विद्रोही युवा मंचच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवार, दि.25 जानेवारी पासुन उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.तरीही उपोषण कर्त्यांच्याय मागण्यांकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे.सामाजिक कार्यकर्ते शैलेष कांबळे व अ‍ॅड.विलास लोखंडे यांच्यासह एकुण 7 जण आमरण उपोषणास बसले आहेत.उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसत आहे. तरीही या बाबत प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेत नाही.यामुळे जनतेतून तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विद्रोही युवा मंचने प्रशासनास दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत. 1.एन.आर.सी,एन.पी.आर,सी.ए.ए हे भारतीय घटना बाह्य कायदे रद्द करुन देशात इथुन पुढे सर्व निवडणूका बॅलेट पेपर द्वारे घेण्यात याव्यात.,2. अंबाजोगाई शहर व उपविभागात पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने चालणारे गुटखा,मटका,जुगार व इतर अवैद्य धंदे तात्काळ बंद करावेत.,3.दलित अत्याचार प्रकरणात विशेष कायद्याची पायमल्ली करणार्‍या पोलीस उपअधिक्षक यांना आरोपी करुन कायदेशीर कार्यवाही करावी.,4.गायरान धारकांचे प्रलंबीत प्रकरणे तात्काळ निकाली काढुन कास्तकर्‍यांना 7/12 द्यावा.अ) 1-ई ला नोंद घ्यावी ब) गायरान धारकांचे वहीतीचे पेरणी पंचनामे करावेत. क) पेरणी पंचनाम्याआधारे पीक विमा गायरान धारकांना लागु करावा.,5.नांदेड येथील अल्पवयीन मातंग मुलीवरील बलात्कार प्रकरणात संपूर्ण तपास व्हिडीओ रेकॉर्डीगद्वारे करावा.अ) प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी ब) प्रकरणात तपास अधिकार्‍याने एका महिन्याच्या आत तपास अहवाल विशेष न्यायालयात दाखल झाल्यापासून 2 महिन्यांत प्रकरण निकाली काढावेत.,6. खोलेश्‍वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तत्कालीन मुध्याध्यापक,अध्यक्ष व सचिव यांना सहआरोपी करावे.अ) प्रकरणातील पिडीतेचे संपूर्ण पुनर्वसन करुन संपूर्ण शिक्षण व नौकरीची जबाबदारी शासनाने घ्यावी.ब) प्रकरणातील पिड़ीतचे न्याय प्राप्तीसाठी प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी.,7.अल्पवयीन बलात्कार प्रकरणात आरोपीस मदत करण्याच्या उद्देशाने खोटे वैद्यकिय प्रमाणपत्र निर्गमित करणार्‍या अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयाचे अधिष्ठातांसह इतरांना सहआरोपी करण्यात यावे.,8) दलित आदिवासी भुमिहिनांना अबंजोगाई येथील देवस्थानाच्या जमिनी 5-5 एकर भाडेतत्वावर देण्यात याव्यात.,9) बेघर लोकांना शासकिय जमिनीत घरासाठी 1 गुंठा जागा देण्यात यावी आदी मागण्यांचा सदरील निवेदनात समावेश आहे.विद्रोही युवा मंच,अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या आमरण उपोषणात शैलेष कांबळे,अ‍ॅड.विलास लोखंडे, धम्मानंद कासारे,परमेश्‍वर जोगदंड,महेंद्र कांबळे,राहुल जोगदंड,जयपाल दहिवाडे, सुहास जोगदंड,मुंजा गायकवाड या उपोषणकर्त्यांचा समावेश आहे.विद्रोही युवा मंचच्या आमरण उपोषणाला सामाजिक कार्यकर्त्या सविताताई आकुसकर यांनी पाठींबा देवून एक दिवस उपोषणात सहभाग घेतला.उपोषणाला युवा भिम सेना,लोकजनशक्ती पार्टी,वंचित बहुजन आघाडी,भिम आर्मी, डेमॉक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया, संविधान रक्षक सेना,लोकजागर मंच,परिवर्तन युवा आघाडी, बहुजन रयत परिषद,युवा आंदोलन,सत्यभामा सौंदरमल, अतुल टेकाळे,छाया हिरवे, सुनिल जगताप यांच्यासह विविध राजकिय पक्ष,सामाजिक संघटना आणि व्यक्तींनी पाठींबा दर्शविला आहे.