परळी तालुकाबीड जिल्हा

वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाचा प्रभाग क्र.९ मध्ये समारोप - किशोर पारधे

परळी:आठवडा विशेष टीम― दि.३० रोजी मा.वाल्मिक अण्णा कराड गट नेते न.प.परळी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाचे व विविध कार्यक्रमाचा समारोप प्रभाग क्र.९ शिवाजी नगर येथे करण्यात आला. या प्रसंगी भास्कर मामा चाटे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रविंद्र परदेशी, अमोल कानडे, रामभाऊ ढेंगळे, अमोल महाराज गुट्टे, महेश गोविंद मुंडे, नारायणदादा मुंडे, सतीश जगताप, अमोलजी सूर्यवंशी, महेंद्र रोडे, राजाभाऊ कांबळे, गणपतअप्पा कोरे, रविराज राठोड, अवस्थी साहेब, श्रावण घाटे, शंकर साळवे, अशोक दहीवडे, राजाभाऊ जगतकर, तक्षशील सावंत, गरड मामा, अनिल अवचारे आदी जण उपस्थित होते.
या स्वच्छता अभियानात परळीच्या स्वच्छतेसाठी परळीतील मोंढा मार्केट, पोलीस स्टेशन, सार्वजनिक स्मशान भूमी, तहसीलकार्यालय, न्यायालय परिसर, बस स्टॅन्ड परिसर, सरकारी दवाखाना, नगर परिषद व शिवाजी नगर अशा विविध भागात स्वच्छेतेसाठी विविध उपक्रम राबवून उत्कृष्ठ काम केल्याबद्दल परळीतील सर्व भागातील नागरिकांतून स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती किशोर पारधे व न.प.कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

दि.७ जानेवारी पासून परळीतील प्रत्येक प्रभागात जाऊन स्वच्छतेची मोहीम सभापती किशोर पारधे हे वयक्तिक लक्ष देऊन राबवणार आहेत. परळीतील कोणत्याही भागातून स्वच्छतेसंबंधी कसलीही तक्रार असल्यास (९४२३४७२४४२ / ८४८५०४५५५५) या नंबर वर संपर्क करावा असे नम्र आवाहन करण्यात आले आहे. आपली तक्रार लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल.