दादासाहेब कसबे राज्यस्तरीय मुकनायक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील पत्रकार दादासाहेब कसबे यांना बीड येथील महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक पाक्षीकाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विशेष समारंभात राज्यस्तरीय मूकनायक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मूकनायक पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार दादासाहेब कसबे यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

अंबाजोगाई येथील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दादासाहेब आश्रुबा कसबे हे गेल्या 17 वर्षांपासुन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात भारत सिटी न्युज,बीड संचार ते सायं. दै.अभिमान अशी झाली.गेल्या 15 वर्षांपासुन सायं.दै. अभिमानचे कसबे हे तालुका प्रतिनिधी आहेत.पत्रकार म्हणुन काम करताना सामाजिक बांधिलकी जोपासत बातम्यांमधून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली आहे.गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे पत्रकार म्हणुन व सामाजिक जबाबदारीचे भान जोपासात पत्रकारिता करणार्‍या दादासाहेब कसबे यांना पत्रकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना यापुर्वी अंबाजोगाई शहरातील आई सेंटरच्या वतीने आईरत्न पत्रकारिता पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
बीड येथील महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक दिनानिमित्त रविवार, दि.2 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमास राज्याचे समाजकल्याण मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, आ.संदीप क्षीरसागर, सुशिलाताई मोराळे,ज्येष्ठ विचारवंत प्रल्हाद लुलेकर, शिवाजीराव जाधव,टि.व्ही.9 चे पत्रकार शिवाजी कश्यप,उत्तम हजारे,अनिल मगर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दादासाहेब कसबे यांना राज्यस्तरीय मूकनायक पत्रकारिता पुरस्काराने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये दिमाखदार व भव्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.दादासाहेब कसबे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आ. संजयभाऊ दौंड,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,संपादक राजेंद्र होळकर, संपादक अशोक सोनवणे,मंगेश निटुरकर,डॉ.राहुल धाकडे, डॉ.राजेश इंगोले,पिपल्स बँकेचे बीड येथील शाखाधिकारी राजेंद्र कांबळे,सचिन वडमारे, अंबाजोगाई शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या,मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.