औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

दुष्काळी पट्ट्यात सज्जांवर तलाठ्यांची टंचाई, अठरा सज्जांचा कारभार ९ तलाठ्यांवर

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव महसूल विभागात असलेल्या तालुक्यातील अठरा सज्जाच्या ८४ महसुली गावांचा कारभार ९ तलाठ्यांवर सुरु आहे.त्यामुळे महसूल विभागालाच आधी दुष्काळाची चाहूल लागली आहे.बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची वाढलेली चिंता आणि महसूल आणि कृषी विभागात असलेली कर्मचाऱ्यांची टंचाई यामुळे सोयगाव तालुक्याची दुष्काळाची धग आणखीनच वाढली आहे.
सोयगाव तालुक्यात एकीकडे अवकाळी पावसाने खरीपाची हाताची गेलेली पिके आणि रब्बी हंगामावर बदलत्या वातावरणाचा झालेला परिणाम यामुळे सोयगाव तालुका दुष्काळाच्या दह्कातेत अडकलेला आहे.त्यातच रब्बीच्या पिकांवर झालेला अलींचा प्रादुर्भाव आणि गहू पिकांवर झालेला उन,थंडीचा प्रादुर्भाव यामुळे संकटात सापडलेली पिके यामुळे शेतकरी अडचणीत असतांना मात्र शेतकऱ्यांना महसूलचा तलाठी आणि कृषी विभागाचा कर्मचारीच सापडत नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.८४ महसुली गावांना मात्र ९ तलाठी कामकाज पाहत असतांना जिल्हा प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.अठरा तलाठी सज्जा असलेल्या सोयगावला मात्र ९ तलाठी कामकाज करत आहे.त्यामुळे दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना महसुली कामांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहे.