अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हासामाजिक

अंबाजोगाईत 9 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर,पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन

महामेळाव्यास मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- भरतराव पतंगे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मराठा समाजातील वधु-वर व पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन रविवार,दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह,नगरपरिषद कार्यालयाशेजारी,परळी रोड, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी करण्यात आले आहे.या महामेळाव्याचे उदघाटन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांच्या हस्ते होईल तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुधीर देशमुख (अधिष्ठाता, स्वा.रा.ती.शा.वै.महा.व रूग्णालय,अंबाजोगाई.) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या महामेळाव्यास मराठा समाजातील इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांनी तसेच मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक रेशीमगाठी मराठा वधू-वर सुचक केंद्राचे अध्यक्ष भरतराव पतंगे यांनी केले आहे.

अंबाजोगाईतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था, संचलित रेशीमगाठी मराठा वधु- वर सुचक केंद्रामार्फत रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह,नगरपरिषद कार्यालया शेजारी,परळी रोड,अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी मराठा समाजातील इच्छुक वधू-वर व पालकांचा परिचय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याचे या महामेळाव्याचे उदघाटन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांच्या हस्ते होईल तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुधीर देशमुख (अधिष्ठाता, स्वा.रा.ती.शा.वै.महा.व रूग्णालय,अंबाजोगाई.) हे असतील.तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे,
माजी आमदार पृथ्वीराज साठे,
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे,ज्येष्ठ पत्रकार प्रा.नानासाहेब गाठाळ, सामाजिक कार्यकर्ते अनंतदादा लोमटे,सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव काळे,डॉ.प्रल्हाद गुरव,उद्योजक प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या महामेळाव्यात नियोजित वधु-वर यांचा परिचय, पालकांची ओळख व वधु-वर यांच्या परिचयपञाचे (बायोडाटा) अदान-प्रदान होईल.महामेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. महामेळाव्याच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.रेशीमगाठी मराठा वधू-वर सुचक केंद्र,सर्व सकल मराठा समाज बांधव, मराठा सेवा संघ,मराठा महासंघ यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महामेळाव्याच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेत आहेत.राज्यस्तरीय मराठा समाजातील वधू-वर व पालक परिचय महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन रेशीमगाठी मराठा वधू-वर सुचक केंद्राचे भरतराव पतंगे (अध्यक्ष),अरूणराव काळे (उपाध्यक्ष),गणेश पतंगे(सचिव), रघुनाथराव जगताप(सहसचिव), दत्ताञय कदम (कार्याध्यक्ष), सदाशिवराव सोनवणे (सदस्य), रामकिशन बडे (सदस्य) आदींनी केले आहे.