ब्रेकिंग न्युजशैक्षणिकसामाजिक

महामाता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी ; किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

आठवडा विशेष टीम―एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या संपूर्ण आदिवासी वस्तीवरील शाळेत महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 7 रोजी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कूंझरकर यांनी आज दिनांक 7 फेब्रुवारी महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना अभिवादन सभेनंतर मार्गदर्शन केले .प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कुटुंबाची मातेची पत्नीची साथ असते हे लक्षात आणुन देत महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनाचा परिचय करून दिला. सर्वच महापुरुष थोर पुरुष समाजसेवक प्रेरणादायी असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मार्ग विश्व कल्याणाचा मार्ग असल्याचे राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.
यावेळी सुरेश भील सुभाष भील सुनील भील राकेश माळी सखाराम सोनवणे सीमा सोनवणे रेखा भी ल आदी मान्यवरांसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.