औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

आदिवासी विकास संघटना (असो.) महाराष्ट्र सोयगाव तालुका अध्यक्ष पदी दत्ताञय सोनवणे यांची निवड

सोयगाव, दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यातील गलवाडा(अ) येथील दत्ताञय रघुनाथ सोनवणे यांची आदीवासी विकास संघटना ( असो.)महाराष्ट्र राज्य अंतर्गत सोयगांव तालुका अध्यक्ष म्हणून निवडीचे पञ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजय कोळी यांनी सोयगाव तालुका अध्यक्ष म्हणून दत्ताञय सोनवणे यांना नियुक्ती चे पञ देऊन संघटने साठी जोमाने कामाला लागा असेसांगितले, यावेळी भारत इंगळे, दत्तू इंगळे,सुनिल सैदाणे,गोपाळ इंगळे,आनंदा इंगळे, कैलास इंगळे, अनिल इंगळे, दत्तू निकम,सुरेश घन,राहुल कोळी,राहुल इंगळे, रविंद्र इंगळे, दिपक सोनवणे, शंकर इंगळे, अतुल सोनवणे, व आदीसह अभिनंदन केले.