औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी―सविताताई काकडे

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटिल―स्रीयांनी कुटुंबांच्या तंदुरस्तीसाठी स्वत: चे मानसिक व शारीरिक आरोग्य जपावे असे मत त्यांनी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथील आजीवन शिक्षण व विस्तार विभाच्या वतीने सोयगाव तालुक्यातील महिलांसाठी आयोजित आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले. स्री सक्षम तर कुटुंब सक्षम, कुटुंब सक्षम तर समाज व देश सक्षम असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव मा श्री प्रकाश दादा काळे, एकात्मक कृषी व ग्रमीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मिनाक्षीताई बिराजदार, नगरसेविका मनिषा चौधरी, सुरेखा तायडे यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अशोक नाईकवाडे होते, त्यांनी महाविद्यालयाची सामाजिक भूमिका विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रमुख डाॅ भा. ना गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. सैराज तडवी यांनी तर आभार प्रा. सौ. भारती पाटील यांनी मानले.