ब्रेकिंग न्युजराजकारणशैक्षणिक

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणासंदर्भात ग्रामविकास विभागाची बैठक, सूचना पाठवण्याचे आवाहन ; कुंझरकर ग्रामविकास विभागाच्या १० ला राज्य अभ्यास गट बैठकीत सहभागी होणार

आठवडा विशेष टीम―जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भात शक्य तेथे प्राप्त सूचनांनुसार त्रुटी दुर करण्यासह नवीन धोरण आखण्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली . यासंदर्भात राज्य शासनाने एक अभ्यास गट तयार केला असून अभ्यास गटासोबत राज्यातील जवळपास सर्व शिक्षक संघटनांची राज्य अध्यक्ष राज्य महासचिव व प्रतिनिधी सोबत महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्याऑनलाईन बदली प्रक्रिया संदर्भात राज्यभरातील व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपल्या भावना आपल्या सूचना 70 30 88 71 90 या क्रमांकावर सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2020 सकाळी आठ वाजेपर्यंत पाठवाव्यात असे आवाहन शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी केले आहे.
दरम्यान उद्या राज्यातील 39 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष राज्य सचिव व प्रतिनिधींची एक धोरणात्मक निर्णय ची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे एस सी आर टी समोर सदाशिव पेठ अतिथी भवन या ठिकाणी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी शिक्षण विभागात समन्वय समितीचे एकमुखी धोरण राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे बबनराव आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येणार आहे.शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे अहमदनगर , राज्य उपाध्यक्षबबनराव आटोळे बारामती,अरुण जाधव जालना,राज्य सचिव इल्लाहुजु द्दिन फारुकी औरंगाबाद, राजेंद्र म्हसदे,राज्य समन्वयकतथा राज्याचे शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर जळगाव, रवींद्र पाटील ,गिरीश वाणी,प्रसाददादा पाटील सोलापूर ,उत्तरेश्वर मोहोळकर श्री राम परबत, लक्ष्मण नेहवाल ,मीना पगारे विजय समुद्र आदींसह राज्यभरातील 39 शिक्षक संघटनांचे राज्याध्यक्ष या समन्वय समितीत सहभागी आहेत.सर्वांना महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे निमंत्रण प्राप्त झाले असून ते यावेळी उपस्थित राहणार असून शासनासोबत सोमवारी चर्चा करणार आहे. असे शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा राज्य प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.दरम्यान बदली संदर्भात राज्यभरातील शिक्षकांना चिंता असून
राज्य भरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली यासंदर्भात ऑनलाईन धोरण स्वीकारून मागील फडणवीससरकारने राबवलेली प्रक्रिया महा विकास आघाडी ठाकरे सरकार पुन्हा तशीच ठेवते का सुधारणा घडवून काही बदल करते.याकडे जिल्हा व राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे असून त्यांच्या समवेत अन्य सदस्य आहेत. मागील बदली धोरण,प्रस्तावित धोरण प्रस्तावित सुधारणा या स्वरूपात शिक्षक संघटनांच्या भावना लक्षात घेण्यासंदर्भात राज्यव्यापी मीटिंग पुणे येथे होत आहे. या मिटींगमध्ये आपण निमंत्रित असून सहभागी होणार आहोत.
संपूर्ण अभ्यास गटासोबत सकारात्मकचर्चा होईल असा आशावाद असून बैठक झाल्यानंतर आपण आपली प्रतिक्रियाराज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे उपाध्यक्ष बबनराव आटोळे यांच्यासोबत चर्चा करून प्रसारमाध्यमांना देऊ सरकार कुठलेही असो कर्मचारी आणि जनहित जोपासले पाहिजेअसे यावेळी शिक्षण विभाग संघटनाराज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. दरम्यान उद्या 9 रोजी एरंडोल येथे औदुंबर साहित्य रसिक मंचच्या वतीने एरंडोल येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या संदर्भात सकाळी दहा वाजता एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याकारणाने व या संस्थेचे सहसचिव असल्यामुळे आपण शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे यांना कळविले असून उद्या उशिरा किवा परवा नियोजित दिनांक दहा रोजी सकाळी दहा वाजता थेट ग्रामविकास विभागाच्या पुणे येथे आयोजित जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अभ्यास गट बैठकीत समाविष्ट होणार अशी विनंती केली व त्यांनी ती मान्य केल्याचे स्पष्ट केले. आपण राज्य समन्वय समितीच्या सोबत असून सर्वांनी उद्या दिवसभरात व परवा सकाळी आठ वाजेपर्यंत आपले प्रश्न पाठवावे असे आवहन केले.
राज्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटनांनी उद्या व परवा पुणे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर , राज्य उपाध्यक्ष बबनराव आटोळे आदींनी केले.