सोयगाव येथील रा.प आगारात सुरक्षित सप्ताहाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर संपन्न

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव येथील बस रा.प. सोयगाव आगारात सुरक्षित सप्ताहाच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. कसबे यांच्यासह खालील कर्मचारी उपस्थित होते.डॉ. केतन काळे डाॅ. सपकाळ ,वैद्यकीय अधिकारी, व्हि. डी. कारके वरिष्ठ लिपिक भागवत बटेकर , सुनील वानखेडे (समुपदेशक) दारा सिंग राठोड, वाहन चालक, रविराज शेळके, साईनाथ जाधव व इतर

आरोग्य शिबिराची सुरुवात ही सर्वप्रथम उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या स्वागत सत्काराने करण्यात आली त्या निमित्ताने डॉ. कसबे यांनी रा.प. कर्मचारी तसेच अधिकारी पर्यवेक्षक यांना आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व स्वतःच्या प्रमुख उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी केली .

याचा लाभ आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक के.बी.बागुल लेखाकार, के. टि. कावळे,लिपिक, सतीश पाटील, विनोद जाधव वाहतूक नियंत्रक, जे. पी. तायडे वाहतूक नियंत्रक, राहुल ठाकूर सह इतर कर्मचाऱ्यांनी घेतला.

सदर आरोग्य शिबिराचे आयोजन व उपस्थितीबाबत लेखाकार के. टी. कावळे यांनी सर्व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानले.